मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात संजय दत्त मोबाईलच्या माध्यमातून परीक्षेत नक्कल करताना दाखवला होता. मात्र, औरंगाबादेत यापेक्षाही हायटेक मुन्नाबाई नक्कल करताना पकडले गेले आहेत. सातारा पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींनी चक्क बनियनच्या आतून वायरिंग करत हायटेक पद्धतीने परीक्षेत नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. तो देखील राज्य राखीव दलाच्या परीक्षेत.
सातारा परिसर येथे 850 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेत मदन घुसिंगे आणि विजयसिंह जारवाल या विद्यार्थ्यांनी हायटेक पद्धतीने नक्कल करण्याचा प्रयत्न केला. बनियनच्या शिलाईमध्ये मोबाईल छोट्या डिव्हाईसच्या माध्यमातून वायरिंग लपवण्यात आली होती. ब्लूटूथच्या माध्यमातून परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची उत्तर ऐकण्यासाठी एक छोट डिव्हाईस कानामध्ये ठेवण्यात आल होतं.
राज्य राखीव दलाच्या पोलिसांना सर्व प्रकार पेपर सुरु होण्याचे वेळी लक्षात आला आणि दोनही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं. दोन आरोपींना अटक करत असताना पवन चारावंडे हा युवक त्यांच्या भावांच्या नावावर परीक्षा देत असताना आढळून आला. नक्कल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांवर नकलीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सातारा पोलिसांनी अटक केलेल्या या दोन मुन्नाभाईना असे सर्किट कोणी तयार करून दिले याचा तपास पोलीस करत असून यामागे कोणती टोळी सक्रीय आहे का याचा तपास सातारा पोलीस करत आहे.