रायगड : रायगडमध्ये फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला आहे. चौक वावर्ले गावात ही घटना घडली आहे. नागपूरमधून फिरायला आलेल्या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
रायगडमधील वावर्ले धरणावर पर्यटनासाठी आलेल्या 5 मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. नागपूरमधून 5 डॉक्टर मित्र रायगड फिरायला आले असताना हा अपघात झाला आहे. धरणात पोहण्याचा मोह या पर्यटकाच्या अंगाशी आला आहे.
शनिवारी रात्री हा अपघात घडला आहे.