प्रकाश सोळंके आणि अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषदेत सुरेश धस आणि त्यांच्या पत्नीवर वैयक्तिक पातळीवर टीका केली होती. त्यानंतर प्राजक्ता धस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हेतू पुरस्पर जनमानसात प्रतिष्ठा मालिन करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश धस गटाने भाजपला मदत केल्यानंतर धस यांना राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात धस यांनी राष्ट्रवादीच्या बीड जिल्ह्यातील काही नेत्यांवर टीका केली होती.
सुरेश धस यांच्या मेळाव्यानंतर प्रकाश सोळंके आणि अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं. मात्र यावेळी त्यांनी आपल्यावर वैयक्तीक पातळीवर टीका केल्याची तक्रार प्राजक्ता धस यांनी दिली.
संबंधित बातमी :