बीड : सूतगिरणी संचालकाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन फसवणूक केल्याप्रकरणी भाजपच्या केज मतदारसंघाच्या आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी प्रकरणात कथित संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन संचालक पदावर नियुक्ती केल्याच्या प्रकरणात केज न्यायालयाच्या आदेशावरून सूतगिरणीचे चेअरमन डॉ. विजयप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनप्पा कांबळे याबद्दल म्हणाले की, सदर गैरव्यवहारात चेअरमन आणि केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी माझ्या खोट्या सह्या करून शासनाची व जनतेची फसवणूक केली आहे. मला नाहक यामध्ये गोवण्यात आले आहे. या आर्थिक व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही.
फॉरेन्सिक तज्ज्ञाचा अहवाल व शपथपत्र जोडून सूतगिरणीचे चेअरमन आणि आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर 153/3 नुसार गुन्हा दाखल करून चौकशी करावी आणि चार्जशीट दाखल करण्याचे आदेश केज प्रथम वर्ग न्यायालयाने दिले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार संगीता ठोंबरे आणि चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात 420, 467, 468, 471 या कलमांनुसार बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल झाले आहेत
खोट्या स्वाक्षरी करुन फसवणूक केल्याप्रकरणी भाजप आमदार संगीता ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Sep 2019 07:47 PM (IST)
सूतगिरणी संचालकाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन फसवणूक केल्याप्रकरणी भाजपच्या केज मतदारसंघाच्या आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -