कार-दुचाकीचा भीषण अपघात, अपघातात दुचाकी जळून खाक
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2018 11:41 PM (IST)
अंबाजोगाईतील हणमंतवाडीजवळ कार व दुचाकीच्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
अंबाजोगाई : अंबाजोगाईतील हणमंतवाडीजवळ कार व दुचाकीच्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातनंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. ज्यात ही दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली आहे. आज (शनिवारी) संध्याकाळी पावणे सातच्या दरम्यान ही घटना घडली. अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी अंबाजोगाईला नेण्यात आले आहे. वकील विश्वास देशमुख हे साताळा-धानोराहून नातेवाईकांचे लग्न आटपून कुटुंबासह इंडिका कारने अंबाजोगाईकडे येत असताना अहमदपूर-अंबाजोगाई मार्गावरील हणमंतवाडीजवळ येताच समोरुन भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. दुचाकीवरील विष्णू महादेव केंद्रे (वय२२), ज्ञानोबां गंगाधर माळवे (वय ३२) हे दोघे गंभीर जखमी झाले. असून या दोघांनाही अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.