कोल्हापूर: कोल्हापूरमधील धोपेश्वरमध्ये तिहेरी अपघातात दोन महिला पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शाहूवाडी तालुक्यातल्या धोपेश्वरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली आहे.
यात्रेसाठी आलेल्या कर्नाटकातील भाविकांच्या क्रूझर गाडीचा ब्रेक फेल झाला. उतारावर त्यांच्या गाडीनं स्कॉर्पिओला धडक दिली. ही स्कॉर्पिओ दरीत जाऊन कोसळली तर क्रूझरनं पुढे जात आणखी एका इंडिका कारला धडक दिली.
या विचित्र अपघातात रस्त्यावरुन चालणाऱ्या सुलाबाई पाटील आणि अक्काताई कांबळे या दोन भाविक महिलांचा मृत्यू झाला. तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओतील भाविकांवर सध्या उपचार सुरु आहेत.