पंढरपूर : पंढरपूर शहराच्या विकासासाठी चक्क कॅनडा सरकारने आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केली आहे. कॅनडा सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परदेशी शहराच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याला तत्वतः मंजुरी देण्यात आली.
कॅनडा सरकारचे प्रतिनिधी आणि मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले, राज्य सरकार प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर पंढरपूर शहराचा विकास करण्याची घोषणा करण्यात आली. 3 ऑक्टोबरला काऊन्सिल जनरल ऑफ कॅनडा पंढरपुरात येणार आहेत.
या योजनेसाठी कॅनडा सरकार आणि मंदिर समिती, नगरपरिषद यांच्यात करार होणार आहे. पंढरपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कॅनडा सरकार करणार आहे. कॅनडा ट्रेड कॉर्पोरेशनच्या वतीने हे काम हाती घेतलं जाणार आहे.
पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारकडून 2 हजार कोटी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Sep 2017 12:21 PM (IST)
भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परदेशी शहराच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याला तत्वतः मंजुरी देण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -