नागपूरः  नागपुरात 45-46 अंशांपर्यंत मजल मारत असलेल्या तापमानानं त्रस्त जनतेची गुरुवारी दुपारी पावसाने फिरकी घेतली. काही मिनिटे फक्त हजेरी लावून वरुणदेव अंतर्धान पावल्याने 'मी येतोय'-फक्त हा संदेश देण्यासाठी तर ते येऊन गेले नाही ना, असे मॅसेज सोसश मीडियावर फिरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या हजेरीमुळे उन्हाच्या चटक्यांपासून काही अंशी दिलासा नागपूरकरांना मिळाला असल्याचे चित्र आहे.


नागपुरी उन्हाळ्याला खरा रंग चढतो मे महिन्यात जेव्हा तापमान 43 अशांपासून  वाढत जाऊन तो 45 अंशापर्यंत वाढत जातो. मे महिन्याच्या शेवटी रोहिणी नक्षत्र  नवतपा सुरु होतो. सर्वाधिक उष्णतेच्या या 9 दिवसात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, अकोला या शहरात पारा 45 आणि कधी कधी 46 अंशांपर्यंत मजल मारतो. मात्र, यंदा मे महिन्यात आणि नवतपा संपल्यानंतर ही उन्हाळा संपायला तयार नसल्याचे चित्र आहे.


नागपूर जेवढा रसाळ संत्र्यांसाठी ओळखला जातो. तेवढीच तीव्र उन्हळ्यासाठी ही शहराची चर्चा होत असते. या वाढत्या तापमानामुळे तर यंदा तर उन्हाळा नागपूर सोडायला तयार नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारणपणे एप्रिल महिन्यात नागपुरात आणि विदर्भात तीव्र उन्हाळा सुरु होतो. एप्रिल मध्ये तापमान 40 ते 43 अंशांपर्यंत वाढते. कधी कधी तो 44 किंवा अपवादात्मक परिस्थिती 45 अंशांपर्यंत ही जाते.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या तापमान 45 अंशाच्या जवळपास राहील. नंतर मात्र मान्सून पूर्णपणे महाराष्ट्रात दाखल होऊन सक्रिय होण्यास अजून काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.


मी येतोय...


दिवसभर चटके देणाऱ्या या तापत्या उन्हात अचानक वारा सुटला आणि काही क्षणातच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या काही सेकंदातच पाऊस धारा थांबल्या. यामुळे पाऊस फक्त नागपूरकरांची फिरकी घेण्यासाठीच आला का असे मॅसेजेच सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली. मात्र पावसाच्या या फिरकीमुळे काही अंशी उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला आहे.