मुंबई : विमानतळच्या धर्तीवर राज्यात एसटी महामंडळ 9 नवीन 'बसपोर्ट' तयार करणार आहे. यामध्ये विमानतळावर ज्या सुविधा मिळतात, त्या एसटीच्या प्रवाशांसाठी दिल्या जातील. यामध्ये एसटी डेपो आणि आगारचा काही भाग व्यापारी वापरांसाठी दिला जाणार असून, याची मूळ मालकी एसटी महामंडळकडे असणार आहे. यामधून एसटी महामंडळला उत्पन्न मिळणार आहे. कुठल्या बसस्थानकांना 'बसपोर्ट' करणार? नॅन्सी कॉलनी (बोरिवली, मुंबई) पनवेल (रायगड) शिवाजीनगर (पुणे) पुणे नाका (पुणे) सोलापूर नाशिक औरंगाबाद नांदेड अकोला मोरभवन (नागपूर) ही सारी बसस्थानकं खासगी आणि सार्वजनिक भागिदारीतून विकसित केली जाणार आहेत. या आगारांचे रुपांतर 'बसपोर्ट'मध्ये केले जाणार आहे. राज्यात लवकरच आधीच्या तुलनेत मोठ्या संख्य़ेने वातानुकुलित बस सेवा सुरु केली जाणार आहे. याला साजेशी एसटी महामंडळ बसपोर्ट उभारली जाणार आहेत. यापैकी काही बसपोर्टमध्ये 32 ते 35 आसनी मिनी थिएटर असणार आहे, ज्यामध्ये मराठी चित्रपट दाखवले जाणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं. लवकरच रत्नागिरी आगारात असे थिएटर बघायला मिळणार आहे. पनवेलला पहिले बस पोर्ट ते सुद्धा पुढील दोन वर्षात प्रत्यक्षात येणार असल्याचं रावते यांनी सांगितलं.