फेसबुकवर विरोधी कमेंट, भाजप आमदार कन्येची काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 09 Jan 2017 06:33 PM (IST)
बेळगाव : भाजप आमदार राजू कागे यांच्या कन्येची दादागिरी समोर आली आहे. आमदार राजू कागे यांच्याविरोधात फेसबुकवर कमेंट केल्याने आमदार कन्या समीक्षा कागे यांनी काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. अथणी तालुक्यातील उगारमध्ये घटना घडली. राजू कागे हे बेळगावमधील कागवाडचे भाजप आमदार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते विवेक शेट्टी यांनी फेसबुकवर विरोधी कमेंट केली. त्याचा राग मनात ठेवून आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार कन्यने विवेक शेट्टींना मारहाण केली. काँग्रेस कार्यकर्ते विवेक शेट्टी यांच्या घरावर हल्ला करत, त्यांना मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 1 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता आमदार कन्या समीक्षा आणि आमदारांचे बंधू शिव गौडा कागे यांनी समर्थकांना सोबत घेऊन विवेक शेट्टींना बेदम मारहाण केली. आमदार कन्येच्या मारहाणीत जखमी झालेल्या विवेक शेट्टी यांना महारष्ट्रातील मिरज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.