Panic Button in Private Travel Fail: पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये 26 वर्षे तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे .त्यानंतर दुसरीकडे कल्याणीनगर परिसरात 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनियर समोर गाडी चालवत असताना रियर व्ह्यू मिररमध्ये पहात हस्तमैथुन करण्यास सुरुवात केल्याची धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली .या दोन्ही घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर (WOmen Safty)  आला आहे . दरम्यान ,दिल्लीतील निर्भय प्रकरण आणि पुण्यातील कॅब चालकाने तरुणीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर केंद्र आणि राज्य शासनाने खाजगी कॅब तसेच खाजगी ट्रॅव्हल्स व चारचाकी वाहनांमध्ये जीपीएसप्रणालीद्वारे तात्काळ मदत मिळावी यासाठी पॅनिक बटन बसवण्याचा निर्णय घेतला होता .(Panic Button) गेल्या सात वर्षांनंतरही हे पॅनिक बटन काहीही काम करत नाही .या बटनाने पोलिसांना अलर्ट जातो ना कुणाला मदत हवी अशी माहिती मिळते .छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयासमोरच एबीपी माझाने या पॅनिक बटनचा डेमो केला . यातून काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्यात .पाहूयात खास रिपोर्ट .


सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पॅनिक बटन फेल


महिलांच्या सुरक्षेसाठी 2017 मध्ये लागू करण्यात आलेल्या या स्थानिक बटनाच्या नियमाचा कुठलाही उपयोग होताना दिसत नाही .या पॅनिक बटन मधून ना पोलिसांना अलर्ट जातो मदत मिळते .त्यामुळे वाहनांमध्ये बसवलेले पाणी बटन्स केवळ देखाव्या पुरतच असल्याचे समोर आले आहेत .छत्रपती संभाजी नगरच्या पोलीस आयुक्तालयासमोर प्रत्यक्ष पॅनिक बटन दाबूनही पाहण्यात आले मात्र कुठलाही अलर्ट यातून गेला नसल्याचे उघडकीस आले .यावरून राज्यभरातील खासगी बस कॅब आणि वाहनांमधील पॅनिक बटनची अवस्था काय असू शकते हे लक्षात येते .


पॅनिक बटनाचा निर्णय अंमलबजावणीत फेाल


महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पॅनिक बटनचे नियम वेगळे आहेत .पुण्यात प्रवास करताना ड्रायव्हरच्या बाजूला आणि मागे बसलेल्या व्यक्तींनाही पॅनिक बटन दाबता यावं म्हणून दोन्ही दरवाजांच्या मधोमध पॅनिक बटन लावण्याचा नियम आहे .मात्र छत्रपती संभाजीनगर मध्ये ड्रायव्हरच्या बाजूला एकच पॅनिक बटन लावलं जातं .आता प्रश्न असा आहे की ड्रायव्हर जर अप्रिय घटना करत असेल ,तर त्याच्याच बाजूच पॅनिक बटन तो कसं दाबू देईल ?  प्रत्येक चार चाकी वाहनाला  बटन बसवण्यासाठी 15000 रुपयांचा खर्च येतो .हे पाणी बटन बसवल्याशिवाय गाडीचं पासिंगही केलं जात नाही .मात्र हे बटन कामच करत नसेल तर त्याचा उपयोग काय ?महिला सुरक्षेच्या नावाखाली केवळ निर्णय झाला मात्र अंमलबजावणी तो कसा फोल ठरला याचे हे उदाहरण आहे .


हेही वाचा:


Pune Crime Swargate bus depot: दत्तात्रय गाडेचं शेवटचं लोकेशन पोलिसांना सापडलं, स्वारगेटमध्ये तरुणीवर अत्याचार केल्यानंतर कुठे गेला?