पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एका दीड वर्षांच्या मुलीच्या पोटात फुटलेल्या सेल शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात यश आलं. निगडीमध्ये दोन दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली.

दीड वर्षांच्या मुलीने खेळत असताना रिमोटमधील चपटा सेल गिळला. मात्र पोटात गेल्यानंतर सेलचा स्फोट झाला. त्यानंतर या चिमुकलीवर आकुर्डीतील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन स्फोट झालेला सेल बाहेर काढला.

चिमुकली रडत असल्याने आईने तिच्या हातात रिमोट दिलं. या रिमोटवर चिकटपट्टी लावली होती. उत्सुकतेपोटी मुलीने चिकटपट्टी काढली, त्यावेळी त्यातून सेल बाहेर आला. हा सेल तिने गिळला. ही बाब आईच्या लक्षात आल्यानंतर तिने तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल केलं.

हा सेल आत जाऊन फुटल्याने मुलीच्या जीवालाही धोका झाला असता. त्यामुळे तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचं आव्हान डॉक्टरांसमोर होतं. मात्र डॉक्टरांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ही चिमुकली आता सुखरुप आहे.