मुंबई : 500 आणि हजाराच्या नोटा चलनातून बंद झाल्यानं देशभरातील नागरिक गोंधळून गेले आहेत. व्यवहारातील अडथळे टाळण्यासाठी काही बँका 1 तास आधीच म्हणजेच सकाळी 8 वाजताच उघडण्यात आल्या.

बँकांमधून पैसे काढण्यासाठी आणि नोटा बदलून घेण्यासाठी मोठी गर्दी जमली. मात्र एटीएम बंद असल्यानं नागरिकांना पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे बँकांबाहेर झुंबड उडाली आहे.

तुम्हाला दिवसा 4 हजार रुपयांपर्यंतच पैसे बदलून मिळतील. पैसे बदलण्यासाठी पॅन कार्ड आणि आधारकार्ड किंवा मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे.

पैसे बदलण्यासाठी सोप्या टिप्स


1) सर्वात आधी रिझर्व्ह बँकेने पुरवलेला विहीत नमुन्यातील अर्ज भरा. (अर्ज बँकेत मिळेल, पण फॉर्म जर आधीच मिळवला, तर बँकेत जाऊन फॉर्म घेणं आणि तो भरण्याचा वेळ वाचेल) खाली फॉर्म दिला आहे, तो सेव्ह करुन घ्या.

2) फॉर्मवर तुमचं नाव लिहा.

3) तुमचं ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, नरेगा कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र यापैकी एक जे असेल त्यावर टिक करा. (ओरिजनल ओळखपत्र आणि त्याची झेरॉक्स सोबत ठेवा)

4) तुमच्याकडे असलेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटांचा तपशील त्यामध्ये लिहा. जसे की तुमच्याकडे 500 च्या किती आणि हजार रुपयाच्या किती नोटा आहेत.

5) फॉर्मवर सही करुन, ठिकाण आणि तारीख लिहा.



संबंधित बातम्या

तुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल?


नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार


500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर


नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला


एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी


टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप


आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक


देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प


कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?


500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?


500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द