जुन्या नोटा खपवण्यासाठी रेल्वे तिकीटावर उड्या
एबीपी माझा वेब टीम | 10 Nov 2016 01:28 PM (IST)
मुंबई : नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरु होताच आता साठवलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांकडून रेल्वेचं 50 हजांरापेक्षाही जास्त किंमतीचं तिकीट बूक केलं जात आहे. जळगावमध्ये अवघ्या 2 तासांत 5 लाखांचं बूकिंग झालं आहे. बूक केलेलं तिकीट रद्द करुन रेल्वेकडून पुन्हा रिफंड घेण्याची नामी शक्कल अनेकांनी अवलंबली आहे. मात्र या सर्व तिकीट बूक करणाऱ्यांवर सरकारची देखील करडी नजर आहे. 50 हजारांपेक्षा अधिक रकमेचं तिकीट बूक करणाऱ्यांना पॅन कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500, 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर नोटा बदलण्यासाठी आज देशभरात एकच गर्दी झाली आहे. 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर जुन्या नोटा रेल्वे स्टेशल, एअरपोर्ट, बस स्थानक, रुग्णालय अशा ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहेत. रेल्वे स्टेशनवर जुन्या नोटा खपवण्याची धडपड सरकारच्याही लक्षात आल्याने कडक पाऊल उचलण्यात आलं आहे. संबंधित बातम्या