मुंबई : कितीही मोठी आग लागली तरी ब्लास्ट न होणाऱ्या गॅस सिलेंडरची निर्मिती करण्यात आली आहे. कॉन्फिडन्स अँड टाइम्स ग्रुप कंपनीने या सिलेंडरची निर्मिती केली आहे. जी.ओ. इलाइट असं या ब्लास्ट न होणाऱ्या सिलेंडरचे नाव आहे. आज या सिलेंडरचे मुंबईमध्ये लाँचिंग करण्यात आले.
जी.ओ. इलाइट सिलेंडर दिसायला इतर सिलेंडरसारखा जरी असला तरी त्यापेक्षा फार वेगळा आणि फायदेशिर आहे. विशेषत: एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत या सिलेंडरचे वजन कमी असून ते पारदर्शकसुद्धा आहे. ज्यामुळे सिलेंडरमध्ये गॅसची मात्रा किती शिल्लक आहे, याचे आनुमान लावता येईल.
शॉर्टसर्किटमुळे अन्यथा कोणत्याही कारणाने आग लागली तरी या सिलेंडरचा ब्लास्ट होत नाही. कॉन्फिडन्स आणि टाईम्स ग्रुप कंपनीने मिळून या सिलेंडरची निर्मिती केली आहे. मागील काही वर्षांपासून या सिलेंडरचे परीक्षण सुरु होते. शेवटी अनेक चाचण्यानंतर आज या सिलेंडरचे लाँचिंग करण्यात आले आहे.
एलपीजी सिलेंडर इतकेच या जी.ओ इलाईट सिलेंडरचे दर असणार आहे. शिवाय सामान्य नागरिकांना सब्सिडी मिळावी याबाबतही प्रयत्न सुरु असल्याती माहिती मिळत आहे. लवकरात लवकर सामान्य जनतेपर्यंत हे सिलेंडर पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं कॉन्फिडन्स ग्रुपचे चेअरमन नितीन खरा यांनी सांगितलं.
ब्लास्ट न होणाऱ्या या सिलेंडरमुळे स्वयपाक घरात काम करणाऱ्या महिलांना आता ब्लास्ट होण्याची चिंता राहणार नाही, हे मात्र नक्की. त्यामुळे भविष्यात या सिलेंडरची मागणी मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे.
ब्लास्ट न होणाऱ्या गॅस सिलेंडरची निर्मिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Mar 2019 05:49 PM (IST)
जी.ओ. इलाइट सिलेंडर दिसायला इतर सिलेंडरसारखा जरी असला तरी त्यापेक्षा फार वेगळा आणि फायदेशिर आहे. विशेषत: एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत या सिलेंडरचे वजन कमी असून ते पारदर्शकसुद्धा आहे. ज्यामुळे सिलेंडरमध्ये गॅसची मात्रा किती शिल्लक आहे, याचे आनुमान लावता येईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -