कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे लोकसभेच्या रिंगणाततून थेट क्रिकेटच्या रिंगणात उतरल्याचे आज पाहायला मिळालं. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखेळे या गावात प्रचारादरम्यान राजू शेट्टी यांनी चक्क क्रिकेट खेळात षटकार लगावला.

Continues below advertisement


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातून पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचाराचा भाग म्हणून ते सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखेळे येथे प्रचार करताना खासदार राजू शेट्टी यांनी चक्क क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला तसेच स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे चिन्ह असलेल्या बॅटचाही त्यांनी प्रचार केला. राजू शेट्टी यांनी यावेळी गावकऱ्यांसोबत क्रिकेट खेळत षटकारही लगावले. राजू शेट्टी यांच्या क्रिकेटची चर्चा चांगलीच रंगली आहे.