Bulldhana Crime News : बुलढाणा (Bulldhana) जिल्ह्यातील अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. बापानेच आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून हत्या केली आहे. पती पत्नीतील वादातून दुहेरी हत्याकांडांने बुलढाणा जिल्हा हादरला आहे. या घटनेमुळं समाजमन सुन्न झालं आहे. रुई (जि. वाशिम) येथील राहणारा राहुल चव्हाण, जो पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करतो, याने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Continues below advertisement

प्रवासादरम्यान नवरा-बायको यांच्यात वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण आपल्या पत्नी आणि दोन मुलींना घेऊन घरच्या दिशेने जात होता. प्रवासादरम्यान नवरा-बायको यांच्यात वाद सुरु झाला. या वादात रागाच्या भरात पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला, तर राहुल आपल्या मुलींसह पुढे निघाला. रागाच्या भरात खामगाव - जालना मार्गावरील अंढेरा फाटा जवळील जंगलात त्याने आपल्या दोन जुळ्या मुलींची गळा कापून निर्दयपणे हत्या केली. या घटनानंतर राहुलने स्वतः वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हत्येची कबूली दिली. पोलिसांनी तत्काळ अंढेरा पोलिसांना संपर्क करून प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटना स्थळ गाठून मृत चिमुकल्यांचे मृतदेह हस्तगत केले आहेत. संपूर्ण परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. सध्या आरोपी राहुल अंढेरा पोलीसांच्या ताब्यात असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

BJP Leader Nephew Murder Case: दुपारी मोठ्या भावाला दिली धमकी, संध्याकाळी लहान भावाला संपवलं; भाजप नेत्याच्या पुतण्याच्या हत्येची थरारक कहाणी