Parinay Fuke : भंडाऱ्यातील एक नेता 20% कमिशनखोरी करतो, असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खास विश्वासू परिणय फुकेंनी (Parinay Fuke)  केलाय. दरम्यान अद्याप ते आपल्या आरोपांवर ठाम आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, त्या नेत्याने नातेवाईकाची बोगस कंपनी उभारून कोट्यवधीचे काम लाटले. दरम्यान 'तो' नेता कोण हे सांगायला मात्र फुके सध्या तयार नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी प्रकरणाची चौकशी करणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर सर्वकाही बाहेर येईल, असा दावा परिणय फुकेंनी केला आहे.

Continues below advertisement


दरम्यान, याच मुद्यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्टीकरण देत परिणय फुके यांनी भंडारा सीओबद्दल चौकशी करण्याची मागणी केली आहे, त्यात तथ्य आहे. विना मान्यता कामं दिले होते ते प्रकरण पुढे आणल्याचे म्हटलं आहे.


Parinay Fuke : पुढील 7 दिवसात चौकशी होऊन दूध का दूध, पानी का पानी होईल


दरम्यान, भंडाऱ्यातील 20 टक्के कमिशनच्या प्रकरणावर पुढील 7 दिवसात चौकशी होऊन दूध का दूध, पानी का पानी होईल, असा दावा भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. भंडाऱ्यातील एक नेता सरकारी विकास कामातून 20 टक्के कमिशन खातो, असा गंभीर आरोप परिणय फुके यांनी दोन दिवसांपूर्वी भंडाऱ्यात केला होता. आपल्या आरोपांमध्ये 20 कोटींच्या नियमबाह्य कामाची यादीही पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांचे निर्देशाप्रमाणे भंडाऱ्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत 20% कमिशन खोरीच्या या प्रकरणाची चौकशी करावी, असे निर्देश दिल्याचा फुकेंचा दावा आहे.


Bhandara News : कमिशनखोरी करणारा तो नेता महायुतीचा की महाविकास आघाडीचा?


कमिशनखोरी करणाऱ्या त्या नेत्याने आपल्या नातेवाईकाच्या नावाखाली एक बोगस कंपनी ही उभारली असून भंडारा आणि पवनी नगरपरिषदमधील सर्व कामे त्याच कंपनीला मिळवून दिले जाते आणि पुढे ती कंपनी छोट्या कंत्राटदारांना छोटे छोटे काम वाटून कमिशनखोरी करते, असा आरोप ही फुकेंनी केला आहे. दरम्यान, कमिशनखोरी करणारा तो नेता महायुतीचा की महाविकास आघाडीचा याचा कुठलाही स्पष्टीकरण फुके यांनी दिलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या सात दिवसांच्या चौकशीनंतर सर्व काही स्पष्ट होईल, असं परिणय फुके म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या