यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील गणेश राठोड यांच्या घराच्या छतावर काल वळू चढल्याने एकच खळबळ उडाली होती. आज क्रेनच्या सहाय्याने वळूला खाली उतरवण्यात आले.
महागाव येथील शेतकरी गणेश राठोड यांचे तांड्यात घर आहे. राठोड रविवारी सकाळी शेतात जायला निघाले, त्यावेळी घराच्या छपरावर वळू चढलेला दिसला. छपरावर चढलेल्या वळूला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी झाली.
वळू छतावर अडकून पडल्याने राठोड कुटुंब काळजीत पडले होते. वळूला चाऱ्याचं प्रलोभन दाखवूनही झाले. त्याला खाली उतरवायचे हरतऱ्हेचे प्रयत्न झाले. मात्र तरीही वळूला खाली उतरवायचे कसे, या प्रश्नावर गोंधळ सुरुच होता. अखेर क्रेन मागवण्यात आली आणि वळूला खाली उतरवण्यात आलं.
वळूला खाली उतरवल्याने राठोड कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
छतावर चढलेल्या वळूला अखेर क्रेनने खाली उतरवलं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Aug 2018 04:56 PM (IST)
महागाव येथील शेतकरी गणेश राठोड यांचे तांड्यात घर आहे. राठोड रविवारी सकाळी शेतात जायला निघाले, त्यावेळी घराच्या छपरावर वळू चढलेला दिसला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -