Buldhana News : बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच आपली व्यथा मांडत मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) कान उघडणी केलीय. राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत राज्यातील शिक्षण व्यवस्थेची सध्यास्थिति बाबत भाष्य केलंय. राज्यातील शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे कॉपीयुक्त झालेली आहे. मुलांना शाळेत काहीही येत नाही. एकट्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात सध्या असलेले सेंटर हे सगळे कॉफी सेंटर झालेले आहेत. त्यामुळे परीक्षा व्यवस्था पूर्णपणे खराब झाली आहे. मुलांना काहीही येत नाही आणि त्यामुळे तो पुढे काही करू शकत नाही. कालांतराने  अशी मुलं एक तर चौकात उभी राहतात किंवा राजकारणात जातात असे म्हणत राधेश्याम चांडक यांनी शिक्षण व्यवस्थेवर टीका केली आहे. मात्र त्यांच्या या मिश्किल शब्दातील टीकेमुळे मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्व लोकांमध्ये काहीवेळ हशा पिकला. 


शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही 


आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी ते काल  बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बुलढाणा शहराच्या धाड नाका परिसरात असलेल्या ओमकार लॉन्स येथे महायुतीचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्यातील डॉक्टर, वकील , उच्च शिक्षित आणि इतर मान्यवरांच्या मेळाव्याला देखील संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यासह विदर्भात झालेल्या अवकळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही जरी निवडणुकीत गुंतलो असलो तरी मी दररोज सकाळी या विषयी माहिती घेतो. तसेच मी मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या कडूनही माहिती घेत या विषयी त्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागरूक आहे. शेतकऱ्यांना आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना वेळीच योग्य नुकसान भरपाई दिल्या जाईल. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


विकासकार्याचे पुढचं पाऊल म्हणजे भाजपचा जाहीरनामा


आगामी लोकसभा निवनडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकताच भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्धी केलाय. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपचा प्रसिद्ध झालेल्या जाहीरनामा हाच महायुतीचा जाहीरनामा आहे. त्याचे मी स्वागत करतो. गेल्या दहा वर्षात मोदींनी देशाचा कायापालट केला आहे. त्यांनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात जे विकासकार्य केलंय त्याचे हे पुढचे पाऊल आहे. हा जाहीरनामा सर्वसामान्यांचं जीवन बदलणारा जाहीरनामा आहे .त्याच मी स्वागत करतो आणि मोदींना धन्यवाद देतो असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या