Pune : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात आज पुन्हा एक आत्महत्येची घटना घडली आहे. MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन आज सकाळी 8 वाजता आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सागर पवार असं एम पी एस सी करणाऱ्या 26 वर्षीय विद्यार्थ्यांचे नाव आहे.
खोलीला आतून लॉक लावून केली आत्महत्या
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, खोलीला आतून लॉक लावून आत्महत्या केली आहे. आज सकाळी त्या खोलीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. हा तरुण पुण्यात MPSC परीक्षाची तयार करत होता. हा मुळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. एम पी एस सी परीक्षाच्या नैराश्यातून आत्महत्या केला असल्याचा संशय पोलिसाना व्यक्त केला आहे. दरम्यान, या मुलाचे कुटुंबीय आल्यानंतर अधिक माहिती कळेल. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अजूनही यामध्ये सुसाइड नोट वगैरे काही मिळून आलेलं नाही. विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.
भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना, दुचाकीच्या धडकेत 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलांडत असलेल्या 10 वर्षीय मुलाचा वेगात आलेल्या दुचाकीने दिलेल्या जोरदार धडक दिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी चालवणारा गौरव कैलास सोनवणे आणि त्याचे वडील कैलास एकनाथ सोनवणे दोघेही जखमी झाले आहेत. दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. ज्यावरून पोलिसांनी पुढील कारवाई वेगाने सुरू केली आहे.
फिर्यादी नितीन तानाजी कदम यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा श्रीनिवास नितीन कदम (वय 10) हा शाळा सुटून घरी जात असताना रस्ता ओलांडत होता. त्याच वेळी लाल रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून येणाऱ्या गौरव सोनवणे यांनी निष्काळजीपणे आणि अत्यंत वेगात वाहन चालवत थेट श्रीनिवास याला जोरदार धडक दिली. धडकेत मुलगा दूर फेकला गेला आणि त्याच्या डोक्यातून, हातातून व पायातून प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. तातडीने रुग्णालयात हलविल्यानंतरही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या: