Chunky Panday Abp Majha Mahakatta : दिवंगत अभिनेते किशोर कुमार यांच्याबरोबर मला अमेरिकेत जाण्याचा योग आला. त्यांची बॅग घेऊन. त्यांच्यासोबत मी अमेरिकेत फिरलो. अमेरिकेत कलाकारांना मोठा मान मिळतो, त्यानंतर मी चित्रपटात काम करण्याचं अभिनेता होण्याचं ठरवल्याचे मत बॉलीवूड अभिनेते चंकी पांडे यांनी व्यक्त केले. याबाबत देशात आल्यानंतर मी आई वडिलांना सांगितले. त्यानंतर तीन ते चार वर्ष ट्रेनिंग घेतले. 19 वर्षी सुरु केलेली तयारी 23 व्या वर्षी मला पहिला चित्रपट मिळाल्याचे चंकी पांडे म्हणाले. आज एबीपी माझाच्या (ABP Majha) महाकट्ट्यावर (Majha Maha Katta) बॉलीवूड अभिनेते चंकी पांडे आले होते. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर स्पष्टपणे मत मांडलं आहे.  

Continues below advertisement


पैसे कमवण्यासाठी मी विविध व्यवसाय केले


मेहबूब स्टुडीओत किशोर कुमार यांनी माझ्या दुसऱ्या चित्रपटातील गाणे गायले याचा मला अभिमान असल्याचे चंकी पांडे म्हणाले. कॉलेज सुटल्यानंतर मी ठरवलं होतं की,मला पैसे कमवण्याची सवय होती. मी विविध व्यवसाय केले. फरशी विकण्याचं काम देखील मी केले. पैसे मिळवण्यासाठी मी विविध व्यवसाय केल्याचे चंकी पांडे म्हणाले. कॉलेजमध्ये असताना मी मस्तीखोर होतो. त्यामुळं आई वडिलांकडून मला ओरडा पडत होता. माझे आई वडिल अतिशय स्ट्रीक्ट होते. वडिलांनी वाटायचे की मी माझ्या मनाने काम करावे. 


ज्यावेळी मला त्रिदेव चित्रपट मिळाला नाही, त्यावेळी मी खूप रडलो


ज्यावेळी मला त्रिदेव चित्रपट मिळाला नाही, त्यावेळी मी खूप रडल्याचे चंकी पांडे यांनी सांगितले. पैशावरुन थोडा इश्यू झाला होता असेही त्यांनी सांगितले. मी राजीव राय यांचे पाय देखील पकडले होते की मला पुढच्या चित्रपटात तर संधी द्या असे चंकी पांडे यांनी सांगितले. 


इतक्या वर्षानंतरही शाहरुख खानसोबत आमची चांगली मैत्री


अभिनेता शाहरुख खान ज्यावेळी पहिल्यांदा मुंबईत आला त्यावेळी माझा भाऊ चकी पांडे त्याचा पहिला मित्र होता असे चंकी पांडे यांनी सांगितले. या दोघांची खूपचांगली मैत्री होती. त्यानंतर आमची मैत्री झाली होती. इतक्या वर्षानंतरही आमची चांगली मैत्री आहे. आमच्या दोघांच्या पत्नी चांगल्या मैत्रीणी आहे. आमची मुले चांगले मित्र असल्याची माहिती चंकी पांडे यांनी दिली. शाहरुख खानचे कुटुंब हे माझे कुटुंब असल्याचा उल्लेख देखील चंकी पांडेंनी केला. शाहरुख पहिला जसा होता तसाच आताही आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे चंकी पांडे म्हणाले. बॉलीवूडच्या क्षेत्रात तुमचे चांगले मित्र असणे गरजेचे आहे. या क्षेत्रात माझे तीन चार चांगले मित्र असल्याचे चंकी पांडे यांनी सांगितले. आमचा एखादा चित्रपट प्रसिद्ध होतो त्यावेली आम्ही सगळे एकत्र असतो, त्यानंतर आम्ही सगळे आपल्या कामात व्यस्त असतो. धर्मेंद्रजी यांच्यासोबत मी चित्रपटात पहिलांदा काम केले होते असेही त्यांनी सांगितले. 



महत्वाच्या बातम्या:


Yash Birla : स्वातंत्र्यलढ्याचा वारसा, शिक्षण क्षेत्रात काम, भारतीय संस्कारांचा वारसा, यश बिर्लांनी नव्या उद्योजकांना कोणता मंत्र दिला?