Jayakumar Gore : सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore)  यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. काल काही लोकांच्या सभा इथं झाल्या. इथं आल्यावर लोकं विकासायचं बोलायचं विसरून जातात. कार्यकर्त्यांचे संरक्षण करण्याची ताकद भाजपमध्ये आहे, त्यामुळं कोणी धमक्या देऊ नये असे वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केले.  काल वडाळा येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी राजन पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना जयकुमार गोरेंनी निशाणा साधला. 

Continues below advertisement

ज्या गावच्या बोरी आणि त्याच गावच्या बाभळी

ज्या गावच्या बोरी आणि त्याच गावच्या बाभळी असंही जयकुमार गोरे म्हणाले. पण आम्हाला बोर पण माहिती आणि बाभळ पण माहिती आहे. त्यामुळे असल्या धमक्या आता इथं कोणी देऊ नये असंही जयकुमार गोरे म्हणाले. आम्ही काम करत असताना भाजप जेव्हा भूमिका घेतो तेव्हा आमच्यासोबत आलेल्या लोकांसोबत भाजप खंबीरपणे उभा ही राहतो. त्यामुळं असं कोणी दबावात राहायचं कारण नाही असे गोरे म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचे गोरे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

प्रत्येकाचा एक काळ असतो. दरवेळी दमदाटी करुन चालत नाही. प्रत्येकाचा फुगा हा फुटत असतो. मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढले जाते, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच भाजपमध्ये गेलेल्या राजन पाटील (Rajan Patil) यांना लक्ष्य केले. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत (Angar Nagarpanchayat Election) गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली होती. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या राजन पाटील यांनी अनेक वर्षांपासून सत्ता आहे. राजन पाटील यांनी अनगर नगरपंचायतीमधील 17 जागा बिनविरोध निवडून आणल्या होत्या. मात्र, नगराध्यक्षपदी राजन पाटलांची सून रिंगणात असताना अजित पवार गटाकडून उज्वला थिटे (Ujjwala Thite) यांना रिंगणात उतरवले होते. उज्वला थिटे यांना उमेदवारी अर्जच भरता येऊ नये, म्हणून अनगरमध्ये दहशतीचे राजकारण झाल्याची चर्चा होती. शेवटी निवडणूक अधिकाऱ्यांनी नाट्यमयरित्या उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरला होता. याविरोधात उज्वला थिटे कोर्टात गेल्या होत्या, परंतु, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. यानंतर उज्वला थिटे यांनी आपण राजन पाटील यांच्याविरोधात लढा सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit Pawar) हे गुरुवारी सोलापूरमधील वडाळा येथील कार्यक्रमाला हजेरी लावल्या होती. या कार्यक्रमात अजित पवारांच्या हस्ते उज्वला थिटे यांचा सत्कार करण्यात आला. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar in Solapur: मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं, प्रत्येकाचा फुगा फुटत असतो; अजित पवारांचा राजन पाटलांवर हल्लाबोल