Buldhana News Updates : नवरा बायकोतील भांडणं हा काही नवीन प्रकार नाही. संसार म्हटलं की या गोष्टी आल्याचं. काहींनी तर म्हटलं आहे की जितकी नवरा बायकोतील भांडण तितकं त्यांचं एकमेकांशी प्रेम घट्ट असतं. पण काही वेळा नवरा बायकोतील ही भांडणं विकोपाला देखील जातात. नवरा बायकोतील भांडणात मारहाण होण्याचं आयुष्यावर उठण्याचे देखील प्रकार घडत असल्याचं आपण पाहतो. मात्र नवरा बायकोतील भांडण झाल्यावर कुणी उपोषणाला बसलं असेल असं तुम्ही कधी ऐकलं नसेल. बुलढाण्यातील नांदुरा येथील एक नवरोबा चक्क आपल्या बायकोच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसला आहे. गणेश मुरलीधर वदोडे असं या नवरोबाचे नाव आहे.


नवरोबा नेमकं का बसले उपोषणाला?


गणेश वदोडे यांच पाच वर्षांपूवी लग्न झालं होतं. काही कारणांनी त्यांचं आपल्या बायकोशी पटलं नाही म्हणून बायको त्यांना सोडून माहेरी गेली. अनेक दिवस वाट बघून बायको येत नसल्याने त्याने अनेकदा बायकोची मनधरणी केली पण काही फायदा झाला नाही. उलट बायकोने घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं.


नवरोबाची सटकली आणि थेट नांदुरा पोलीसात तक्रार दिली. तक्रार दिल्यावरही पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याने आता चक्क नवरोबा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. बायकोवर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी नवरोबा कालपासून नांदुरा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसल्याने परिसरात चर्चेचा विषय बनले आहे. 


गणेश वदोडे यांचं बारा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दहा वर्षे संसार सुरळीत चालला. पण काही कारणांनी त्यांचं आपल्या बायकोशी पटलं नाही म्हणून बायको त्यांना सोडून माहेरी गेली. अनेक दिवस वाट बघून बायको येत नसल्याने त्याने अनेकदा बायकोची मनधरणी केली पण काही फायदा झाला नाही. उलट बायकोने घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं. यानंतर गणेश यांनी  थेट नांदुरा पोलीसात तक्रार दिली. तक्रार दिल्यावर ही पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याने आता चक्क नवरोबा गणेश तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. बायकोवर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी गणेश कालपासून नांदुरा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसल्याने परिसरात चर्चेचा विषय बनले आहेत.  माझी बायको आणून द्या किंवा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी आता उपोषणाला बसून गणेशरावांची आहे.


या बाबत आम्ही तहसीलदारांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेलो तर सुरुवातीला तहसीलदारांनी कपाळावर हातच मारला. बराच वेळ चर्चा झाल्यावर संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल असं आश्वासन तहसीलदारांनी दिलं आहे.