Dhanteras 2022 :  आज धनत्रयोदशी (Dhanteras) च्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव (Buldhana Khamgaon News) येथील चांदीच्या बाजारपेठेत चांदी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. खामगाव येथील चांदी देशभरात शुद्धतेसाठी प्रसिद्ध असल्याने देशातील अनेक भागातील ग्राहक चांदी खरेदीकरता धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खामगावात येतात. खामगावची चांदी शुद्धतेसाठी प्रसिद्ध असल्याने अनेक मोठे नेते, अभिनेते, क्रिकेटपटू खामगावतील चांदी खरेदी करतात. चांदीच्या मूर्त्या, चांदीची भांडी इत्यादीची धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदी केली जाते. अभिनेता अमिताभ बच्चन ते क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Amitabh Bachchan and sachin tendulkar) यांच्या घरातील चांदीच्या मुर्त्या देखील खामगावातील आहेत. 
 
खामगावातील चांदी ही शुद्धतेसाठी प्रसिद्ध असल्याने देश विदेशातील ग्राहक या ठिकाणी चांदीची मूर्ती भांडी आणि दागिने खरेदी करण्यासाठी येतात यावर्षी निर्बंधमुक्त वातावरण असल्याने चांदीच्या व्यवसायात जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झालेली असल्याचं येथील सराफा व्यापारी सांगतात.


खामगावातील चांदीच्या मुर्त्यांना आणि भांड्यांना शुद्धतेमुळे नेते, अभिनेत्यांना सुद्धा भुरळ घातली आहे. देशभरातील नेते आणि अभिनेते या ठिकाणाहून चांदीची भांडी खरेदी करतात.  महानायक अमिताभ बच्चन आणि भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या घरी सुद्धा गणपती मूर्ती आणि अनेक भांडी खामगावातून खरेदी करून नेल्याचे येथील सराफा व्यावसायिक सांगतात.


ही देखील बातमी वाचा- Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला फक्त एक रुपयात खरेदी करा सोनं, होम डिलिव्हरीही उपलब्ध


दुरून दुरून या ठिकाणी ग्राहक चांदी खरेदी करण्यासाठी येतात. अनेक ग्राहक तर 40- 50 वर्षापासून या ठिकाणी दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी खरेदी करण्यासाठी येत असतात, असंही व्यापारी सांगतात. 


खामगावची चांदी शुद्धतेमुळे प्रसिद्ध असल्यामुळे या शहराला रजत नगरी म्हणूनही देशभरात ओळखलं जातं. वर्षभरातील विविध मुहूर्तावर या ठिकाणाहून चांदीचे दागिनेच नव्हे तर चांदीची भांडी सुद्धा ग्राहक खरेदी करून नेतात. यावर्षी निर्बंध मुक्त वातावरणात चांदीच्या विक्रीत 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झालेली बघायला मिळाली आहे.