Gold Shopping on Dhanteras 2022 : दिवाळीला सुरुवात झाली आहे. आज धनत्रयोदशी (Dhanteras) आहे. देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये धनत्रयोदशी दिवशी (Dhanteras 2022) सोनं खरेदी केली जाते. या दिवशी सोनं खरेदीला (Gold Buying) विशेष महत्त्व आहे. यादिवशी लोक सोने-चांदी खरेदी करतात. ज्वेलर्सकडे या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते.
सध्या डिजिटल युगात लोक कपडे आणि इतर सामानांप्रमाणे सोने-चांदीचीही ऑनलाईन शॉपिंग करतात. सोने-चांदी खरेदी म्हटलं की मोठी गुंतवणूक मानली जाते. यासाठी खर्चही अधिक येतो. पण सोनं खरेदीचा एक सोपा मार्गही आहे. तुम्ही डिजिटल सोनं (Digital Gold) खरेदी करु शकता. यामध्ये तुम्ही कमी खर्चात सोनं खरेदी करु शकता. अगदी एक रुपयात तुम्ही सोनं खरेदी करु शकता. फक्त एक रुपयामध्ये सोनं कसं आणि कुठे खरेदी करायचं जाणून घ्या.
फक्त 1 रुपयात सोनं खरेदी करा
तुम्ही धनत्रयोदशीनिमित्त फक्त एक रुपयात डिजिटल गोल्ड (Digital Gold) खरेदी करु शकता. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता. तुम्ही अनेक प्रकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. तुम्ही एक रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत सहज सोने खरेदी करू शकता. प्राचीन काळापासून लोकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते, परंतु आता चोरीच्या भीतीने लोकांनी डिजिटल माध्यमातून सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. हे सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही पेटीएम (Paytm), फोन पे (Phone Pay), गुगल पे (Google Pe) सारखे मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्म वापरू शकता. या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही फक्त एक रुपयामध्ये 999.9 शुद्ध प्रमाणित सोनं खरेदी करू शकता.
डिजिटल सोनं कसं खरेदी करायचं?
- एक रुपयात सोने खरेदी करण्यासाठी तुम्ही आधी तुमचं मोबाईल वॉलेट उघडा.
- यामध्ये तुम्हाला वरच्या बाजूला गोल्ड आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- यानंतर Manage your Money मधील Buy Gold पर्याय निवडा.
- यानंतर, तुम्हाला किती सोने खरेदी करायचे आहे याचा पर्याय निवडा.
- याशिवाय तुम्ही खरेदी, विक्री, डिलिव्हरी किंवा गिफ्ट पर्याय निवडू शकता.
- त्यानंतर पैसे देऊन सोने खरेदी करा.
- जर तुम्हाला सोने विकायचे असेल, तर विक्रीचा पर्याय निवडा.
- तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सोनं भेट म्हणूनही देऊ शकता.
सोन्याची होम डिलिव्हरीही उपलब्ध
तुम्हाला हवे असल्यास हे डिजिटल सोने तुम्ही घरपोच मिळवू शकता. सोने घरपोच डिलिव्हरी केल्यावर तुम्हाला ठराविक रक्कम जमा करावी लागेल. यासोबतच सोन्याची डिलिव्हरी घरपोच मिळवण्यासाठी तुम्हाला किमान अर्धा ग्रॅम सोनं खरेदी करावं लागेल. यासोबतच तुम्हाला सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्रही मिळेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या