बुलडाणा : बुलडाण्याच्या गणेशपूरमधल्या कोकरे आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची एकूण संख्या 11 वर पोहोचली आहे.


काय आहे प्रकरण?

बाळा शिवार परिसरातील कोकरे आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव आहे. शाळेतील कर्मचाऱ्यांनीच हे कृत्य केल्याचा आरोप मुलीने केला आहे. मूळची जळगावच्या असणारी ही मुलगी दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी गेली होती. तिथे पोटात दुखत असल्याची तक्रार तिने पालकांकडे केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

याप्रकरणी सुरुवातील 7 जणांना अटक केली होती. तर गुरुवारी रात्री आणखी 4 जणांना अटक बेड्या ठोकल्या. त्यामुळे आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे.

बुलडाणा: आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना


 

तपासासाठी एसआयटीची स्थापना

बलात्कारप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिले आहेत. याशिवाय नागपूर सीआयडी विभागाच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग या खामगावला भेट देणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास बुलडाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर यांच्या निदर्शनाखाली होणार आहे.

बुलडाण्यातील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार


 

आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार : मलिक

दरम्यान, बुलडाण्यातील आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे. शिवाय महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची संख्याही जास्त आहे, असं सांगत आदिवासी मंत्री आणि महिला आणि बालविकास मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही नवाब मालिक यांनी केली.