नागपूर: ब्रिटनहून आलेल्या नागपूरच्या 'त्या' रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह आली आहे. ब्रिटनहून आल्यावर अॅन्टिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह निघालेल्या या रुग्णाला ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे का हे पाहण्यासाठी त्याचे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.


ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर त्या देशातून गेल्या महिनाभरात आलेल्या प्रवाशांची यादी तपासली जात आहे. यामध्ये नागपूरच्या या तरुणाचा समावेश होता. ब्रिटनमधून आल्यानंतर तो अॅन्टिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह सापडला होता. आता या नव्या माहितीमुळे प्रशासनाने सतर्कतेनं या तरुणाची पुन्हा तपासणी केली होती.


या नव्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेऊन त्या रुग्णासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड सेंटर मध्ये वेगळा वॉर्ड करण्यात आला आहे. भारतात परतल्यानंतर त्या रुग्णाला आता एक महिन्याचा कालावधी होत आल्यामुळे हा 'रुग्ण' आता बरा झाला असावा अशी शंका आहे. त्यामुळेच शुक्रवारी करण्यात आलेली त्याची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली असेल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. मात्र भारतात आल्यानंतर ज्या अॅन्टिजेन टेस्टमध्ये हा रुग्ण पॉझिटिव्ह आला होता त्या सॅम्पलचे जिनोम टेस्टिंग पुण्यातील एनआयव्हीमध्ये होणार आहे. या मधून नेमकं समजेल की त्याला लागण झालेला व्हायरस हा नक्की भारतातील कोरोनाचा आहे की ब्रिटनमध्ये सापडलेला नवीन स्ट्रेनचा आहे.


संबंधित तरुण ब्रिटनवरुन आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तीसुध्दा पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यामध्ये गोंदियातील अनेकजणांचा समावेश आहे. त्यामुळे या तरुणाच्या कुटुंबातील इतर सदस्यांचेही जिनोम टेस्टिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.


पहा व्हिडिओ: UK Returned Nagpur Youth Tests Covid-19 Negative | यूकेहून परतलेला नागपूरचा तरुण कोरोना निगेटिव्ह



महत्वाच्या बातम्या: