वर्धा : वर्धा जिल्ह्यातील एका लग्नसोहळ्यात अगदी सिनेस्टाईल प्रकार पाहावयास मिळाला. लग्नाच्या भर मंडपातून नवरीने पळ काढला आणि सर्वत्र एकच खळबळ माजली. मात्र तिथेच उपस्थित असलेल्या एका मुलीने नवरदेवाशी लग्नास होकार दिल्याने लग्नसोहळा पार पडला.
वर्धा जिल्ह्यातील एका लग्नसोहळ्या अगदी फिल्मी प्रकार घडला. नवरा-नवरी बोहल्यावर चढण्यास अवघा काही अवधी असतानाच नवरी पळाल्याचे कळलं आणि वरासह वधूकडील मंडळींनी शोधाशोध सुरु केली. मात्र नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे समोर आले.
नवरीची शोधाशोध सुरु असताना चिंतातूर नवरदेव खुर्चीत बसला होता. त्याचवेळी मंडपातील ज्योती नामक मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. ज्योतीच्या होकारामुळे लग्नसोहळा पार पडला.
"कमी वेळात निर्णय घेताना भीती होती. मात्र नव्याने संसार सुरु झाला आणि लग्नसोहळाही आनंदात पार पडला, याचा आनंद आहे", अशा शब्दात ज्योतीन आपल्या भावना व्यक्त केल्या.
भर मंडपातून नवरी पळाली, तात्काळ दुसरी मुलगी लग्नासाठी तयार झाली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Dec 2017 06:38 PM (IST)
"कमी वेळात निर्णय घेताना भीती होती. मात्र नव्याने संसार सुरु झाला आणि लग्नसोहळाही आनंदात पार पडला, याचा आनंद आहे", अशा शब्दात ज्योतीन आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -