बेळगाव : हम जीते है एक बार, प्यार करते है एक बार और शादी भी एक ही बार.... असं अनेकजण म्हणतात. त्यामुळं जीवनात अतिशय महत्त्वाच्या अशा या टप्प्यांवर प्रत्येकजण हा ते क्षण अगदी मनमुरादपणे जगत असतो. कधी कोणाच्या कल्पनाशक्तीचा अफलातून नमुना अशा प्रसंगी पाहायला मिळतो, तर कधी कोण काय करेल याचाही काही नेम नसतो. 


लग्नसोहळा म्हटलं की, वधू- वर कधी आणि कसे येणार, त्यांचा पेहराव कसा असेल याचीच अनेकांना उत्सुकता. लग्नाला येण्यासाठी वधू- वर बँडबाजा लावून वाजतगाजत गाडी घोड्यावरून येतात. पण ट्रॅक्टर चालवत लग्न मंडपात वधूने येण्याची ही पहिलीच घटना असावी. सध्या कोरोना संक्रमणाची लाट असल्याने शासनानं आखून दिलेल्या नियमांनुसार विवाहसोहळे आणि इतर समारंभांसाठी काही ठिकाणी तहसीलदारांकडून परवानगी घ्यावी लागते. तशी रीतसर परवानगी घेवून च मोजक्या निमंत्रित तांच्या उपस्थितीत बे ळगावजवळील गोजगा येथे अनेखा विवाहसोहळआ पार पडला.


हा विवाहसोहळा अनोखा ठरला तो म्हणजे नववधूच्या धमाकेदार एंट्रीमुळं. नववधू पुनम इथं ट्रॅक्टर चालवत लग्न मंडपाकडे जायला निघाली आणि गावातील लोकांनी हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली. 


वधू वरांना आणण्यासाठी कार सजवतात त्या प्रमाणे ट्रॅक्टर सजवण्यात आला होता. मंडोळी गावातील वर सुभाष आणि गोजगा गावातील पुनम यांचा विवाह वधूच्या स्वगृही गोजगा गावात मारुती गल्लीत पार पडला. यावेळी वधू पुनम हिने आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे सैराट स्टाईलने ट्रॅक्टर चालवत एंट्री करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ट्रॅक्टर चालवत नववधूची  एंट्री झाल्यावर काही वेळातच हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आणि मग काय, चर्चा रंगली याच विवाहसोहळ्याची.