Breaking News LIVE : पुढील तीन-चार तास मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

Breaking News LIVE Updates, 27 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Sep 2021 11:04 PM
पुढील तीन-चार तास मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

पुढील तीन-चार तास मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून इशारा देण्यात आला. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आहे. हिंगोली, औरंगाबाद, जालना, जळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पुढील तीन - चार तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर आणि ठाण्यात पुढील ३-४ तास काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे

आरोग्य विभागाच्या परीक्षेचा मुहूर्त अखेर  ठरला

आरोग्य विभागाच्या परीक्षेचा मुहूर्त अखेर  ठरला असून वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर ही परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलीय. यावेळी परीक्षार्थींना 9 दिवस अगोदरच प्रवेश पत्र मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 

भवानीपूर पोटनिवडणूक रद्द करण्याची भाजप मागणी 

भाजपने भवानीपूर पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी  केली आहे.  भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उमेदवार आहेत. आज पुन्हा हिंसाचार झाल्याने पश्चिम बंगाल भाजपने ही मागणी केली आहे

नांदेड येथील रेणुका माता मंदिर व दत्त शिखर मंदिराला  भाविकांना ये- जा करण्यासाठी रोपवे

रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूरगडावर 'रोप वे' उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या 'वॅपकॉस लिमिटेड' मध्ये करार झाला आहे.  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि 'वॅपकॉस'चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या करारावर स्वाक्षरी केली. माहूरगड नांदेड जिल्ह्यात असून, हे काम लवकर मार्गी लागावे, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण या प्रकल्पाचा पाठपुरावा करीत होते.


'वॅपकॉस लिमिटेड' ही कंपनी केंद्र सरकारचा अंगिकृत उपक्रम असून, ती 'रोप वे' उभारणीतील तज्ज्ञ व अनुभवी कंपनी आहे.  माहूरगड येथील रेणुकादेवी मंदीर, श्री दत्त शिखर मंदीर, अनुसुया माता मंदिरासाठी 'रोप वे' उभारणे तसेच रेणुकादेवी मंदिरासाठी 'फुट ओव्हर ब्रीज' व 'लिफ्ट' उभारण्याच्या कामाला केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत सुमारे ५१ कोटी रूपयांची मंजुरी मिळाली आहे. 


या कामांचा आरखडा तयार करणे, कंत्राट काढणे, कंत्राटदाराच्या कामावर देखरेख ठेवणे ही सर्व जबाबदारी 'वॅपकॉस लिमिटेड'वर राहणार आहे. 
याबाबतच्या करारावर स्वाक्षरी झाल्याने देवीच्या साडेतीन शक्तीपिठांमध्ये समावेश असलेल्या रेणुकामातेच्या मंदिरात 'रोप वे'ने जाऊन दर्शन घेण्याचे भाविकांचे स्वप्न लवकरात लवकर पूर्णत्वास येण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर विशेषतः वयोवृद्ध नागरिकांचा त्रास कमी होणार असून, माहूरगडाला भेट देणाऱ्या भाविकांमध्ये मोठी वाढ होऊन या तीर्थक्षेत्राच्या विकासाला अधिक गती मिळणे अपेक्षित आहे.


 

Kolhapur : घटस्थापनेला अंबाबाई मंदिर खुलं होणार, मात्र भक्तांना देवीची ओटी भरता येणार नाही

राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील.


 


N V Ramana :न्यायव्यवस्थेत महिलांना 50 टक्के प्रतिनिधीत्व देण्याची गरज: सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा

नवी दिल्ली: सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी रविवारी न्यायव्यवस्थेत महिलांना 50 टक्के प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आणि देशभरातील विधी महाविद्यालयांमध्ये समान उपाययोजनांच्या मागणीला समर्थन दिलं.


 



पारधी वस्तीवर चाळीस ते पन्नास जणांचा हल्ला,  पारधी समाजाच्या एक वर्षाच्या मुलासोबतच आजोबाचाही मृत्यू, बीडच्या पाटोदा तालुक्यातील घटना

बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यामध्ये चोरीच्या आरोपातून एका पारधी वस्तीवर चाळीस ते पन्नास जणांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये एका वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता आज त्या मुलाच्या आजोबाचाही उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. एक वर्षाच्या सिद्धांत काळेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता तर आज 70 वर्षे अभिमान काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


पाटोदा तालुक्यात असलेल्या पारनेर या ठिकाणी ही घटना घडली असून पारनेर येथील पारधी वस्तीवर राहणाऱ्या लोकावर चोरीचा आरोप करण्यात आला आणि त्यांच्यावर मध्यरात्री जमावाने हल्ला केला .या हल्ल्यामध्ये एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आठ ते दहा जखमी लोकांवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेतय या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यांमध्ये हल्लेखोर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा दाखल





नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. नायगाव तालुक्यातील साठवण तलावात संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचा अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न. नायगाव तालुक्यातील सोमठाना, हिप्परगा,बाभूळगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल. साठवण तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून दहा वर्षाचा कालावधी लोटूनही सरकार कडून अद्याप मोबदला न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचा रॉकेल अंगावर टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न. घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा  दाखल.


 

 



 


काँग्रेसच्या विनंतीनंतर राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा

काँग्रेसच्या विनंतीनंतर राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा, भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय उमेदवारी अर्ज मागे घेणार, 



काँग्रेसचा नेत्या रजनी पाटील यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा

करमाळा तालुक्यातील डिकसळ पुलावरून कार उजनी धरणाच्या पाण्यात पडली

करमाळा तालुक्यातील डिकसळ पुलावरून कार उजनी धरणाच्या पाण्यात पडली.  करमाळा ते भिगवण मार्गावरील डिकसळ येथील पुलावरून मारूती एक कार उजनी धरण्याच्या बॅक वाटर  पाण्यात पडली. पुण्याकडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार ही कार करमाळा येथील मनसुर  तांबोळी यांची आहे. 
 यातील प्रवाशांबद्दल अजून  काही  माहिती समजू शकली नाही.

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आजपासून 'लसीकरण आपल्या दारी' ही मोहीम सुरू

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आज पासून "लसीकरण आपल्या दारी" ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या मात्र लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ न शकणाऱ्या नागरिकांना या माध्यमातून घरोघरी जाऊन कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. या साठी 3 झोनमध्ये 3 लसीकरण गाड्या देण्यात आल्या आहेत. आज सकाळी महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

आरोग्य विभागातील रद्द झालेली क आणि ड गटातील पदभरतीची पद भरतीची परीक्षा 15 -16 किंवा 22 - 23 ऑक्टोबरला, आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

आरोग्य विभागातील रद्द झालेली क आणि ड गटातील पदभरतीची पद भरतीची परीक्षा 15 -16 किंवा 22 - 23 ऑक्टोबरला होईल अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नुकतीच रद्द झालेली परीक्षा ऐन वेळेला पुढे ढकलण्यात आली. या मागे काही उमेदवाराचं हीत हाच मुद्दा असल्याचं टोपे यांनी सांगितलं असलं तरी ऐन वेळेला परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्रावरती पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यावेळेला रद्द झालेली परीक्षा होणारं की नाही याबद्दलची साशंकता होती. त्यामुळे राजेश टोपे यांनी आज अकरा वाजता मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत या तारखा निश्चित केल्या जातील. 15 व 16 ऑक्टोबरला रेल्वेची परीक्षा आहे ती पुढे ढकलत आली तर प्राधान्य म्हणून याच तारखेला नाही पुढे ढकलता आली तर 22 किंवा 23 ऑक्टोबरला परीक्षा होईल असे सांगितले आहे.

कोल्हापुरात घरगुती गॅसचा स्फोट

कोल्हापुरात घरगुती गॅसचा स्फोट


टाकाळा चौक परिसरातील घटना


स्फोटात दोनजण किरकोळ जखमी, प्रापंचिक साहित्याचे नुकसान


नियाज जमादार, आणि मैनुद्दीन जमादार अशी जखमींची नावं


जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात चिखलगुठ्ठा शर्यती

कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात चिखलगुठ्ठा शर्यती,


केळोशी बुद्रुक इथं हजारो नागरिकांची शर्यत पाहण्यासाठी गर्दी,


परवानगी नसतानाही भरवली चिखलगुठ्ठा शर्यत, हजारो रुपयांची बक्षीस

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे दिले आदेश

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांना ईडीचं समन्स, ईडी कार्यालयात हजर राहण्याचे दिले आदेश, अडसुळ दिल्लीला जाणार असल्यानं हजर राहाणार नाहीत, मुलगा अभिजित अडसुळ यांची माहिती, नवनीत राणांच्या तारखेवेळी नेहमीच समन्स पाठवलं जातं, अभिजित अडसुळांचा आरोप  आम्ही सर्व चौकशीला जायला तयार, पण राणा केसचा निकालही निपक्षपाती हवा, अभिजीत अडसुळांची मागणी 

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात. इंदोर पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले. लोणावळा रेल्वे स्टेशन जवळ पावणे आठ वाजताची घटना. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईहून पुण्याला ही रेल्वे निघाली होती, तेंव्हा लोणावळा स्टेशनवरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर रेल्वे थांबताना अचानक बोगी घसरल्या. रेल्वेच्या मागच्या बाजूच्या या दोन्ही बोगी होत्या, त्यात प्रवासी देखील होते. पण थांबविण्याच्या उद्देशाने रेल्वेचे स्पीड कमी केल्याने मोठी दुर्घटना टळली. सर्व प्रवासी सुखरूप.

मुंबईतील गायमुख घोडबंदर रोडवर रात्री उशिरा मोठा अपघात

मुंबईतील गायमुख घोडबंदर रोडवर रात्री उशिरा मोठा अपघात झाला. तेलाचा टँकर पडल्याने हा अपघात झाला, टँकर खाली पडताच 3 कार आणि एक ट्रक देखील धडकले. या अपघातात कारमधील तिघेजण अडकले, ज्यात कारचा चालक, एक वडील आणि त्याची 18 वर्षांची मुलगी यांचा समावेश आहे. अग्निशमन दलाने त्याला अडकलेल्या कारमधून बाहेर काढले आणि मीरा रोडच्या भक्ती वेदांत रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी ठाणे अग्निशमन दलाची 2 पथके होती, रेस्क्यू व्हॅनसह मीरा भाईंदर आणि पोलीस उपस्थित होती. टँकर पडल्यानं घोडबंदर रोडवर 4-5 किलोमीटरपर्यंत लांब वाहतूक कोंडी दिसून आली. अग्निशमन दलाचे अधिकारी हिंदुराव गोंडवे सांगतात की, टँकर काढण्यासाठी आणखी 2-3 तास ​​लागतील, त्यानंतर या रस्त्यावरील जाम मोकळा होईल.

मुंबईत आज फक्त महिलांसाठी विशेष कोरोना लसीकरण सत्र, पूर्वनोंदणी बंद, थेट केंद्रावर मिळणार लस

मुंबई महापालिकेनं गेल्या आठवड्यात महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र राबवलं होतं. या विशेष सत्राला महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर आजही मुंबई महापालिकेकडून महिलांसाठी विशेष लसीकरण सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेच्या वतीनं आज, सोमवार (27 सप्टेंबर) सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवलं जाणार आहे. यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येऊन कोविड लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. या विशेष सत्राच्या पार्श्वभूमीवर आजसाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.


कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगानं आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र आज सोमवार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत राबवलं जाणार आहे.

71च्या युद्धतील ऐतिहासिक ठेवा 2 वर्षांपासून कचऱ्यात उभा

1971च्या भारत पाकिस्तान युद्धात शौर्य गाजविणारा 'वैजंयता' रणगाडा शहीद मनीष पितांबर यांच्या स्मरणार्थ मुंब्रा स्टेशन जवळच असलेल्या मोकळ्या जागेत बसविण्यात आला होता. मात्र आज तोच महापराक्रमी रणगाडा कळव्याच्या रेतीबंदर जवळ कचऱ्यात ठेवण्यात आला आहे. रंगरंगोटीसाठी काढण्यात आलेला रणगाडा आजपर्यंत पुन्हा बसविण्यात आला नाही. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानं बसविण्यात आलेल्या या रणगाड्याची आज अक्षरशः दुर्दशा झाली आहे. याकडे कोणाचंच लक्ष नाही. 


माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांना युद्धाच्या रणभुमीत शौर्य गाजविणारा 'वैजयंता' रणगाडा शहिद मनीष पितांबरे यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ दिला होता. मुंब्रा स्टेशनजवळ मोकळ्या जागेत हा रणगाडा 19 मे, 2013 रोजी राष्ट्रवादी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करून बसवण्यात आला होता. काही वर्षे मुंब्र्याचे आकर्षण असलेला हा रणगाडा, त्यानंतर मात्र गर्दुल्ले आणि भिकारी यांच्या विळख्यात अडकला होता. या रणगाडयाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक ठेवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते हवेत विरलं. अखेर हा रणगाडा  मुंब्रा स्टेशन परिसरातून 16 ऑगस्ट, 2019 रोजी हटविण्यात आला. तो पुन्हा रंगरंगोटी करून मुंब्रा स्टेशन परिसरात चबुतऱ्याच्या पायऱ्या तोडून काचेत बसविण्यात येणार होता. मात्र दोन वर्ष उलटली तरी त्याकडे कोणाचं लक्ष नाही. सध्या हा रणगाडा रेतीबंदर येथील मोकळ्या भूखंडात ठेवण्यात आला आहे, तो आजपर्यंत धूळखात पडला आहे. सुर्याचं प्रतीक असलेला वैजयंता रणगाडा पुन्हा मुंब्रा स्टेशन परिसरात बसणार कधी? असा सवाल मुंब्रावासी विचारीत आहेत. 

कृषी कायद्यांच्या विरोधात आज शेतकऱ्यांकडून 'भारत बंद'ची हाक

गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmer Protest) पुढचा टप्पा आता पाहायला मिळत आहे. केंद्राच्या तीन  कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha) आज, 27 सप्टेंबरला 'भारत बंद' (bharat bandh) ची घोषणा केली आहे. या बंदला राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटनांसह बँकिंग संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.


भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) नं एका संयुक्त पत्रकात म्हटलं आहे की, कृषी कायदे हटवणे आणि शेतमालाला किमान हमीभाव कायदाच्या मागणीसाठी सुरु असलेला ऐतिहासिक शेतकरी संप 10व्या महिन्यात पोहोचला आहे. यामुळं आता भारत बंदचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर या बंदला पाठिंबा द्यावा, असं या पत्रकात म्हटलं आहे.

पार्श्वभूमी

Bharat Bandh: कृषी कायद्यांच्या विरोधात आज 'भारत बंद'; अनेक पक्ष, संघटनांचाही पाठिंबा


गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmer Protest) पुढचा टप्पा आता पाहायला मिळत आहे. केंद्राच्या तीन  कृषी विधेयकांच्या (Agriculture Bill) विरोधात संयुक्त किसान मोर्चानं (Samyukta Kisan Morcha) आज, 27 सप्टेंबरला 'भारत बंद' (bharat bandh) ची घोषणा केली आहे. या बंदला राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटनांसह बँकिंग संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.


भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) नं एका संयुक्त पत्रकात म्हटलं आहे की, कृषी कायदे हटवणे आणि शेतमालाला किमान हमीभाव कायदाच्या मागणीसाठी सुरु असलेला ऐतिहासिक शेतकरी संप 10व्या महिन्यात पोहोचला आहे. यामुळं आता भारत बंदचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर या बंदला पाठिंबा द्यावा, असं या पत्रकात म्हटलं आहे.


Mumbai Vaccination : मुंबईत आज फक्त महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र; थेट केंद्रावर मिळणार लस


मुंबई महापालिकेनं गेल्या आठवड्यात महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र राबवलं होतं. या विशेष सत्राला महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर आजही मुंबई महापालिकेकडून महिलांसाठी विशेष लसीकरण सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेच्या वतीनं आज, सोमवार (27 सप्टेंबर) सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवलं जाणार आहे. यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येऊन कोविड लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. या विशेष सत्राच्या पार्श्वभूमीवर आजसाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.


कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगानं आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र आज सोमवार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत राबवलं जाणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.