Breaking News LIVE : महिलेला गुप्तांग दाखवून विनयभंग करणाऱ्या सराईत आरोपीला 6 दिवसात सुनावणी पूर्ण करून सुनावली शिक्षा
Breaking News LIVE Updates, 05 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आणखी चार जणांना अटक. या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे : समीर वानखेडे
महिलेला गुप्तांग दाखवून विनयभंग करणाऱ्या सराईत आरोपीला 6 दिवसात सुनावणी पूर्ण करून सुनावली शिक्षा. 18 सप्टेंबर रोजी महर्षी कर्वे रोड येथे महिलेची छेड काढत असल्याचा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आला. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि आरोपीला अटक केली. आरोपी राजकुमार नारायण तांडेलवर याआधीसुद्धा महिलांची छेड काढण्याचे 3 गुन्हे दाखल असून 2 गुन्ह्यात त्याला शिक्षा सुद्धा झाली असल्याचे पोलीसांच्या तपासात निष्पन्न झालं. राजकुमार तांडेल सराईत गुन्हेगार असून त्याला तात्काळ शिक्षा होन गरजेचं होतं. युध्दपातळीवर तपास करत 28 सप्टेंबरला न्यायालयात आरोपपत्र दाखल करत फक्त 6 दिवसांच्या सुनावनीत आरोपीला 3 वर्षांची सश्रम कारावास आणि 1 हजार रु दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सर्व मंत्र्यांसोबत मंगळवारी 12 तारखेला मुंबईत बैठक. बैठकीमध्ये मराठवाडा, विदर्भातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शरद पवार आढावा घेणार असल्याची 'एबीपी माझा'ला सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत असलेल्या मदतीसाठीच्या मोठ्या पॅकेजबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सर्व मंत्र्यांसोबत मंगळवारी 12 तारखेला मुंबईत बैठक. बैठकीमध्ये मराठवाडा, विदर्भातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शरद पवार आढावा घेणार असल्याची 'एबीपी माझा'ला सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत असलेल्या मदतीसाठीच्या मोठ्या पॅकेजबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सर्व मंत्र्यांसोबत मंगळवारी 12 तारखेला मुंबईत बैठक. बैठकीमध्ये मराठवाडा, विदर्भातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शरद पवार आढावा घेणार असल्याची 'एबीपी माझा'ला सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत असलेल्या मदतीसाठीच्या मोठ्या पॅकेजबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये पहाटे अटक करण्यात आलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ही माहिती दिलीय. पहाटे 4.30 वाजता पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केल्याचा दावा चिदंबरम यांनी केलाय. यावेळी त्यांनी प्रियंका गांधींना झालेली अटक नियमांविरोधात असून याप्रकरणी लोकशाही मूल्यांचं हनन झाल्याचंही चिदंबरम यांनी दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत घेणार दिल्लीत राहुल गांधींची भेट, आज संध्याकाळी चार वाजता राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचणार संजय राऊत, गेल्या काही महिन्यात संजय राऊत राहुल गांधींची ही दुसरी थेट-भेट, लखीमपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर होतेय भेट, इतरही राजकीय चर्चेची शक्यता
अकोला : अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मतदान उत्साहात सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी आज मतदान होताये. अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातील कुटासा मतदान केंद्रावर 90 वर्षीय अंजना चव्हाण या आज्जीनं मतदान केलंय.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना सीतापूरमध्ये जिथं ठेवण्यात आलंय त्या ठिकाणी ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यानं केलाय. लखीमपूर हिंसाचारानंतर शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर सीतापूरमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आहे. तिथंच ड्रोनच्या घिरट्या सुरू असल्याचा व्हिडीओ सध्या समोर आलाय.
साई मंदिर दर्शन नियमावली आज जाहीर होणार. या संबंधी सकाळी 11.30 वाजता साई संस्थानची पत्रकार परिषद होणार आहे. नियमावली जाहीर करण्यास साई संस्थान व्यवस्थापन समितीकडून उशीर झाला आहे. दररोज किती भाविकांना दर्शन मिळणार, ऑनलाइन बुकिंग सक्तीची असणार का याबाबतचे धोरण आज होणार जाहीर.
जिल्ह्यात काल पासून शाळा सुरू झाल्यात. पण रुधाना वकाना या गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर जवळपास 10 ते 12 ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. याचा वाईट परिणाम शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांवर होण्याची शक्यता असल्याने हा प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्राम शालेय समितीच्या निदर्शनास आणून दिल्याने आज या गावात पालकांची मिटिंग बोलाविण्यात आली आहे.
चंद्रपुरात एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघड. बल्लारपूर तालुक्यातील केम-तुकूम येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना, गेल्या 3-4 वर्षांपासून मुलींसोबत हे अश्लील चाळे सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. काल पाचवीत शिकणाऱ्या एका मुलीच्या पालकांनी गावकऱ्यांसोबत शाळेत येऊन मुख्याध्यापकाला विचारला जाब, त्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापक भाऊराव तुंबडे (56) याला घेतले ताब्यात, या नंतर पोलिसांनी चौकशी केल्या नंतर एकूण 7 मुली तक्रार देण्यासाठी आल्या पुढे, पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकावर रात्री उशिरा पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून केली अटक.
पार्श्वभूमी
Maharashtra ZP Panchayat Samiti Elections 2021 : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीची रणधुमाळी, आज सहा जिल्ह्यांमध्ये मतदान
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उद्या झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. कोरोनासंकट आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, पालघर आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. आज मतदान तर आज मतमोजणी होणार आहे. आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरूवात होईल. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सर्व ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
MPSC Exam | राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC च्या राज्यसेवा परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. 2 जानेवारी, 2022 रोजी 290 पदांसाठी परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत येणारे एकूण 290 पदांच्या भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात येणार आहे. 5 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते 25 ऑक्टोबर 2021 रात्री 11:59 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करायचे आहेत. हे सर्व अर्ज परीक्षा शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
Maharashtra Corona Update : कोरोनाचा विळखा सैल, राज्यात आज 2, 026 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2, 026 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 389 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 86 हजार 059 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे.
राज्यात आज 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 839 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (14), नंदूरबार (2), धुळे (2), जालना (40), परभणी (72), हिंगोली (15), नांदेड (08), अकोला (22), वाशिम (06), बुलढाणा (23), नागपूर (99), यवतमाळ (09), वर्धा (8), भंडारा (2), गोंदिया (1), गडचिरोली (16 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. राज्यात सध्या 33 हजार 637 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,40,088 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,355 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 93,37, 713 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,62, 514(11.06 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
Facebook Stock Falls : सर्व्हर डाऊनचा फेसबुकला फटका, शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले, अब्जावधी डॉलर्सचे नुकसान
फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इन्स्टाग्रामचे (Instagram) जगभरातील सर्व्हर तब्बल सहा तासांसाठी डाऊन झाले होते. त्याचा फटका या तीनही सोशल मीडिया कंपन्यांना चांगलाच बसलाय. फेसबुकचा विचार केला तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्व्हर स्लोडाऊन होता. 2019 सालीही फेसबुकला अशा स्थितीचा सामना करावा लागला होता. कालच्या या घटनेनंतर फेसबुकचं मोठं नुकसान झालं असून त्याचे शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले आहेत.
फेसबुकच्या गडगडलेल्या शेअर्समुळे कंपनीला अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या दरम्यान, स्लोडाऊनसाठी नेमकं काय कारण आहे याचा शोध कंपनीच्या वतीनं घेण्यात येत होता. या वर्षीच्या जुलै महिन्यात फेसबुकचे शेअर्स एक ट्रिलियन डॉलर्स इतक्या मार्केट कॅप व्हल्यूपर्यंत पोहोचलं होतं. आता त्याची किंमत घसरली असून ती 920 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -