Breaking News LIVE : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

Breaking News LIVE Updates, 23 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 23 Oct 2021 05:16 PM
बॉलीवूडमधील नशेच्या कचऱ्याला साफ करण्याची गरज : रामदेवबाबा

बॉलीवूडमधील नशेच्या जो कचरा झाला आहे, तो समाजासाठी घातक आहे, तो कचरा सर्वांनी मिळून साफ करण्याची गरज आहे असं मत रामदेवबाबा यांनी मांडलं आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होणं हे राष्ट्रहित व राष्ट्रधर्माच्या विपरीत आहे असंही ते म्हणाले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे.  मुंबई महापालिकेने देखील  वृत्ताला दुजोरा दिला आहे.  राज ठाकरेंच्या आईलाही कोरोनाची लागण आहे. 

तपास यंत्रणानी तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे: उज्वल निकम

राज्य किंवा केंद्र सरकार मधील तपास यंत्रणानी तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे, उगाच चमकोगिरी म्हणून वाटेल तशी निवेदने किंवा सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळायला हवी असं विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. आर्यन खान प्रकरणावरुन सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून आणि तपास यंत्रणांच्या तपास करण्याच्या पध्दतीवर त्यांनी हे वक्तव्य केलं. 

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नसून गांजावाले, हर्बल तंबाखूवाल्यांचे प्रवक्ते- गोपीचंद पडळकर
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नसून गांजावाले, हर्बल तंबाखूवाल्यांचे प्रवक्ते- गोपीचंद पडळकर

भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जागा आर्थर रोड जेलमध्ये, आमदार गोपीचंद पडळकरांची टीका

आरोग्य विभागाच्या परीक्षे वेळी आरोग्यमंत्र्यांना परीक्षेचे योग्य नियोजन करता आले नाही. विद्यार्थ्यांना वेळेवर हॉल तिकीट मिळाले नाही, परीक्षा केंद्राचा पत्ता,जिल्ह्यात नाही तर राज्य सोडून परराज्यात व बाहेर देशाचे परीक्षा केंद्र असल्याचे पत्ते होते. तर एक दिवस अगोदर वेळेवर परीक्षा होईल असे म्हणणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी रात्री 10 वाजता आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली असे सांगून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान केले. त्यामुळे कोरोना काळात परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी खेड्या पड्यातून निघालेल्या विद्यार्थ्यांच्या हाल अपेष्टा झाल्या.त्यामुळे अशा पद्धतीने वागणाऱ्या या आरोग्य मंत्र्यांची जागा ही भविष्यात आर्थर रोड जेल मध्ये आहे, अशी टीका देगलूर बिलोली निवडणूक प्राचारार्थ असलेले भाजपा प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी आज केलीय

महसूलमंत्री थोरात इतके निराश का वाटतात ? राधाकृष्ण विखेंची टीका

राधाकृष्ण  विखे पाटलांनी नगर जिल्हयातील एका नेत्याच्या‌ पापाचा घडा भरला असुन कोणी ‌किती महसुल गोळा ‌केला हे चौकशीत समोर येईल अस म्हणटले होते त्यानंतर महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांनी प्रतिउत्तर देताना विखे पाटील सत्तेत नसल्याने त्यांना नैराश्य आले असावे त्यांच्या‌ आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही अस म्हणलं होतं त्यानंतर आज पुन्हा विखे पाटलांनी थोरातांवर निशाणा साधलाय. 
बाळासाहेब थोरात निराश का वाटतात हे मला कळत नाही.मी त्यांचे नाव घेतले नव्हते ,  त्यांनी का मनाला लावून घेतले हे कळाले नाही.निराश होण्यापेक्षा त्यांनी जाहिरपणे सांगावे की त्यांनी बदलीत पैसे घेतले नाही , व्यवहारात , स्टँम्प ड्युटीत पैसे घेतले नाही किंवा त्यांचे कोणतेही ‌कार्यकर्ते वाळू धंद्यात नाही हे थोरातांनी जाहिरपणे सांगावे.मी जे बोललो ते थोरातांच्या मनाला लागलेले दिसते.चौकशी सुरू आहे त्यात समोर येईलच.मला नैराश्य नाही मात्र माझ्या वक्तव्याने थोरात का निराश झाले हा प्रश्न पडला असल्याचे विखे पाटील म्हणाले.

छेडखाणीला कंटाळून अल्पवयीन मुलीने घेतले विष, पीडिताची प्रकृती चिंताजनक

छेडखाणीला कंटाळून इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलीने विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्यावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. बाळू खंदारे असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर पिंपळनेर पोलिस घटनास्थळी धाव घेतली. मात्र पीडित मुलगी अद्याप बेशुद्ध असल्याने तिचा जबाब नोंदवून घेता आला नाही. 

वकील संघाचं आंदोलन मागे
बीड जिल्ह्यातला गेवराई येथील दिवाणी व फौजदारी न्‍यायालयाच्‍या नवीन इमारतीचा काम सहा वर्षापासून रखडलं होतं यासाठी हे काम पूर्ण करावा म्हणून वकील संघाच्या वतीने तब्बल सहा दिवस आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर आता या इमारतीच्या कामाला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे न्यायालय परिसरात असलेले अतिक्रमण देखील हाठवण्यात आले आहेत इमारतीचे काम सुरू होताच  वकील संघाने आपलं आंदोलन मागे घेतलं आहे

छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीने विष घेतले, पीडितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

शाळेतून घरी परतत असताना नववीत शिकणाऱ्या मुलीची एका तरुणाने छेड काढली. अपमान सहन न झाल्याने मुलीने घरी येऊन विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील गुंदा वडगाव या गावात घडलीय. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळू खंदारे असं आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर पिंपळनेर पोलिस घटनास्थळी धाव घेतली मात्र पीडित मुलगी अद्याप शुद्धीवर आली नसल्याने पोलिसांना तिचा जवाब घेता आला नाही.  या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.

गुन्हा घडल्यावर न्याय लवकर मिळाला पाहिजे, पण गुन्हा होऊ नये यासाठी काम केले पाहिजे, कोर्ट रिकामी राहिली पाहिजेत- मुख्यमंत्री

गुन्हा घडल्यावर न्याय लवकर मिळाला पाहिजे, पण गुन्हा होऊ नये यासाठी काम केले पाहिजे, कोर्ट रिकामी राहिली पाहिजेत- मुख्यमंत्री

कोर्टाचे अनेकदा तारीख पे तारीख मिळते आणि सर्वसामान्य पिचतो, मात्र हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न आम्ही सरकार म्हणून करणार आहोत- मुख्यमंत्री

कोर्टाचे अनेकदा तारीख पे तारीख मिळते आणि सर्वसामान्य पिचतो, मात्र हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न आम्ही सरकार म्हणून करणार आहोत- मुख्यमंत्री

लोकशाहीचे स्तंभ कोणत्याही दबावापुढे कोलमडून पडता कामा नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकशाहीचे स्तंभ कोणत्याही दबावापुढे कोलमडून पडता कामा नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उच्च न्यायालयाची नवी इमारत उभारण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

उच्च न्यायालयाची नवी इमारत उभारण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन, औरंगाबादमध्ये नवीन इमारतीचं लोकार्पण

न्यायमंदिराच्या भूमिपूजनला मी नव्हतो पण मी झेंडा लावायला आलो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM UDDHAV THACKERAY LIVE : न्यायमंदिराच्या भूमिपूजनला मी नव्हतो पण मी झेंडा लावायला आलो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

रसायनीनजीक तुराडे गावाजवळील रेल्वे रुळाजवळ आढळले दोन मृतदेह...

रसायनीनजीक तुराडे गावाजवळील रेल्वे रुळाजवळ आढळले दोन मृतदेह...

वावेघर येथील आई आणि मुलाचा मृत्यू, रेल्वेची धडक लागल्याची शक्यता ... 

आपटा ते पनवेल दरम्यानच्या तुराडे गावासमोरील रेल्वे रूळाजवळ आढळले मृतदेह.. 

वावेघर येथील ४५ वर्षीय सुनीता चंद्रकांत पाटील आणि २२ वर्षीय प्रणय यांचा मृत्यू, शुक्रवार रात्रीची घटना..

सकाळच्या महत्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर

1. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक, मुख्यमंत्री आणि कोविड टास्क फोर्समधल्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता

2. दिवाळीच्या तोंडावर राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक, वेतनवाढ आणि एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी 

3. पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरुच, केमिकल टँकरच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर १३ जण जखमी

4. समीर वानखेडेंवरुन किरीट सोमय्यांचा नवाब मलिकांना इशारा, वानखेडेंच्या केसाला जरी धक्का लागला तरी तुमची खैर नाही, सोमय्यांनी सुनावलं

5. भीमा कोरेगाव प्रकरणी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना नोटीस, आयोगाकडून चौकशी होणार

6. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांची स्कॅन उत्तरपत्रिका, गुण व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर 

7. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर, कलम 370 हटवल्यानंतर अमित शाहांचा पहिलाच काश्मीर दौरा

8. आजपासून टी-२० वर्ल्डकपच्या सुपर 12 राऊंडला सुरुवात, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, तर विडिंजसमोर इंग्लंडचं आव्हान

9. चित्रपटाच्या शूटिंगसाठी खऱ्याखुऱ्या बंदुकीचा वापर महागात, हॉलिवूड अभिनेता एलेक बाल्डविननं झाडलेल्या गोळीमुळं सिनेमेटोग्राफरचा मृत्यू, दिग्दर्शकही जखमी

10. कतार सरकारकडून भारतीय कामगारांना खूशखबर, कतारमध्ये काम करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आरोग्य विमा अनिवार्य

पार्श्वभूमी

Breaking News LIVE Updates, 23 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

1. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक, मुख्यमंत्री आणि कोविड टास्क फोर्समधल्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता

2. दिवाळीच्या तोंडावर राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक, वेतनवाढ आणि एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी 

3. पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरुच, केमिकल टँकरच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर १३ जण जखमी

4. समीर वानखेडेंवरुन किरीट सोमय्यांचा नवाब मलिकांना इशारा, वानखेडेंच्या केसाला जरी धक्का लागला तरी तुमची खैर नाही, सोमय्यांनी सुनावलं

5. भीमा कोरेगाव प्रकरणी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना नोटीस, आयोगाकडून चौकशी होणार

6. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांची स्कॅन उत्तरपत्रिका, गुण व गुणांची सीमारेषा आयोगाच्या संकेतस्थळावर 

7. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर, कलम 370 हटवल्यानंतर अमित शाहांचा पहिलाच काश्मीर दौरा

8. आजपासून टी-२० वर्ल्डकपच्या सुपर 12 राऊंडला सुरुवात, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, तर विडिंजसमोर इंग्लंडचं आव्हान

9. चित्रपटाच्या शूटिंगसाठी खऱ्याखुऱ्या बंदुकीचा वापर महागात, हॉलिवूड अभिनेता एलेक बाल्डविननं झाडलेल्या गोळीमुळं सिनेमेटोग्राफरचा मृत्यू, दिग्दर्शकही जखमी

10. कतार सरकारकडून भारतीय कामगारांना खूशखबर, कतारमध्ये काम करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आरोग्य विमा अनिवार्य

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते, थकबाकी द्या,अन्यथा बेमुदत उपोषण, संयुक्त कृती समितीचा इशारा

ST Mahamandal BUS Employee :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेने काल थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला आहे. तर दुसरीकडे 17 संघटनांचा सहभाग असलेल्या संयुक्त कृती समितीनं एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते व थकबाकी द्या,अन्यथा बेमुदत उपोषण करु असा इशारा सरकारला दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचे, नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने 27 ऑक्टोबर रोजी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

T20 World Cup 2021 : टी-20 विश्वचषकाचा खरा थरार आजपासून, आज दोन लढती, तगड्या संघांमध्ये झुंज

T20 World Cup 2021 :   आयसीसी टी-20 विश्वचषक  17 ऑक्टोबरपासून  यूएई आणि ओमानमध्ये सुरु झाला. 17 ऑक्टोबरपासून कालपर्यंत स्पर्धेच्या पात्रता फेरीचे (Qualifier Round) सामने खेळले गेले. यातून चार संघ सुपर 12 साठी निवडले गेले. आजपासून खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या महाकुंभाची सुरुवात होत आहे. आज ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून सुपर 12 मधील सामन्यांना सुरुवात होत आहे. 14 नोव्हेंबर रोजी दुबईत (Dubai) खेळल्या जाणाऱ्या अंतिम (Final) सामन्यात स्पर्धेचा विजेता ठरवला जाईल.उद्या 24 ऑक्टोबरला  भारत (Team India) पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan)  सामन्याने या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि पाकिस्तान या दोघांना या विश्वचषकातील गट 2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.