Breaking News LIVE : संयुक्त किसान मोर्चाकडून योगेंद्र यादव एक महिन्यासाठी निलंबित

Breaking News LIVE Updates, 21 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 21 Oct 2021 11:09 PM
संयुक्त किसान मोर्चाकडून योगेंद्र यादव एका महिन्यासाठी निलंबित

संयुक्त किसान मोर्चाकडून योगेंद्र यादव एका महिन्यासाठी निलंबित
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी शोक व्यक्त करण्यासाठी भाजप कार्यकर्ता शुभम मिश्रा यांच्या घरी भेट दिल्यानंतर केली कारवाई. याची मागणी पंजाबच्या शेतकरी संघटनांनी केली होती.

मुंबई गोवा महामार्गावर खेरशेत जवळ व्हेल माश्याची 6 किल्लो 200 ग्रॅमची उलटी पकडली

मुंबई गोवा महामार्गावर खेरशेत जवळ व्हेल माश्याची 6 किल्लो 200 ग्रॅमची उलटी पकडली. वनविभागाची कारवाई. याची बाजारात अंदाजे किंमत 6 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. चौघांना ताब्यात घेण्यात आले असून यात एका महिलेचा समावेश आहे. महाड, रायगड, गुहागर, माणगांव येथील आरोपी. अजूनही वनविभाग आणि पोलिस यांचा संयुक्त तपास सुरु आहे.

टीईटी परिक्षेची तारीख पुन्हा बदलली, आता 21 नोव्हेंबर रोजी होणार टीईटी परीक्षा

टीईटी परिक्षेची तारीख पुन्हा बदलली, आता 21 नोव्हेंबर रोजी होणार टीईटी परीक्षा. राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये तिसऱ्यांदा बदल करण्यात आला आहे. 30 ऑक्टोबर रोजी होणारी टीईटीची परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले. राज्यात 30 ऑक्टोबर 2021 रोजी टीईटी TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) आयोजित करण्यात आली होती. 


मात्र, त्यादिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक असल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 च्या परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. 


आता टीईटी ही परीक्षा 30 ऑक्टोबर 2021 ऐवजी 21 नोव्हेंबर 2021 रोजी होणार असल्याचे सुधारित वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेतून रोख रक्कम काढण्यावर निर्बंध

सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेने रोख रक्कम काढण्यावर निर्बंध घातलेत. खातेदारांना यापुढे सात दिवसांत फक्त पाच हजार रुपये रक्कम काढता येईल. त्यामुळे खातेधारकांमध्ये संताप आहे. थकीत कर्जाची वसुली नियमित न झाल्याचे कारण देत बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेत रोकड तुटवडा आहे. म्हणून बँकेने केवळ पाच हजार रुपये आठवड्याला काढता येतील असा सूचना खातेदारांना दिल्या आहेत. काही दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल, असंही बँकेकडून सांगण्यात आलंय. खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि कर्जाच्या मोबदल्यात ठेवण्यात येणारे तारण देखील कर्जवाटप क्षमतेच्या दुप्पट एवढे आहे त्यामुळे खातेदारांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन बँकेतर्फे करण्यात येत आहे. मात्र अनेकांच्या एफडी परिपक्व झाल्या आहेत, लग्न, हॉस्पिटल अशा कारणांमुळे पैशाची गरज आहे. मात्र बँकेतर्फे केवळ 5 हजार रुपये काढण्याची मुभा दिली जात आहे, त्यामुळे खातेदार चिंतेत आहेत

एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा येत्या शनिवारी मुंबईत जनता दरबार, मुंबई महापालिकेच्या निमित्ताने भाजपने कंबर कसली





सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी भाजपाच्या वतीने आता जनतादरबार हा उपक्रम राबवला  जाणार आहे. यानिमित्ताने पहिला जनता दरबार केंद्रीय सूक्ष्म लघु आणि उद्योग मंत्री नारायण राणे घेणार आहेत. येत्या शनिवारी दि. २३ ऑक्टोबर दुपारी दोन ते चार या वेळेत भाजप प्रदेश कार्यालयात हा जनता दरबार होईल. यात केंद्रीय मंत्री नारायण राणे सर्वसामान्य आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतील आणि त्या ऑन द स्पॉट सोडवण्याचा प्रयत्न करतील.

 

येत्या सहा महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यादृष्टीने हा जनता दरबार महत्त्वाचा मानला जातोय. मुंबई महापालिकेत शिवसेनेशी दोन हात करायचे असतील तर भाजपला आतापासून तयारी करावी लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोकांना भेटण्याचा उपक्रम म्हणून जनता दरबार राबवला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

नारायण राणे यांच्यासोबत महाराष्ट्रातील इतर केंद्रीय मंत्रीही आपापल्या कार्यक्षेत्रात जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. अर्थात या जनता दरबाराचा भाजपाला कितपत फायदा होतो हे येणारा काळच ठरवेल.


 

 



 


एनसीबीच्या पथकाचा मुंबईत प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी छापेमारी

Mumbai : एनसीबीच्या पथकाचा मुंबईत प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी छापेमारी. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम सुरु

लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलेंडरचे भाव वाढवले, मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका

महागाईने सामान्य नागरिकांच बजेट कोलमडून गेले आहे,त्यामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे, यावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केलीय, महागाई वाढवणारं सरकार केंद्र सरकार आहे याचा निषेध आहे, अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनी महागाईचे दिन आणले तर सिलेंडरचे भाव केंद्र सरकारने यासाठी वाढवले की लोकांनी स्वयंमपाक करावा अशी उपरोधक प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी देत यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल अशी टीका त्यांनी केली...

लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलेंडरचे भाव वाढवले : मंत्री यशोमती ठाकूर

महागाईने सामान्य नागरिकांच बजेट कोलमडून गेले आहे,त्यामुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे, यावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केलीय, महागाई वाढवणारं सरकार केंद्र सरकार आहे याचा निषेध आहे, अच्छे दिन आणणाऱ्या लोकांनी महागाईचे दिन आणले तर सिलेंडरचे भाव केंद्र सरकारने यासाठी वाढवले की लोकांनी स्वयंमपाक करावा अशी उपरोधक प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी देत यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावं लागेल अशी टीका त्यांनी केली. 

महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी सरकारनं बोलावली बैठक, राजेश टोपे, आदित्य ठाकरे, उदय सामंत आणि अधिकाऱ्यांमध्ये होणार बैठक 

महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी सरकारनं बोलावली बैठक  


राजेश टोपे, आदित्य ठाकरे, उदय सामंत आणि अधिकाऱ्यांमध्ये होणार बैठक 


राजेश टोपेंच्या दालनात बोलावली लसीकरणासाठी बैठक 


पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आँनलाईनद्वारे उपस्थित राहणार तर टोपे, सामंत बैठकीला उपस्थित राहणार 


महाविद्यालय सुरु झाली पण विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला होता 


लसीकरणावर तोडगा काढण्यासाठी बोलवली बैठक

तिन्ही पक्षांचे लोक सेटवर जातात खंडणी गोळा करतात, मनसे या लोकांना समोर आणेल, अमेय खोपकरांचा आरोप

मनसेचं नाव घेऊन अनेक सेटवर जातात त्यांच्याशी मनसेचा कोणताही संबंध नसतो


मनसे हे शोधून काढेल की राष्ट्रवादीचे लोक कसे सेटवर जाऊन पैसे घेतात, 


तिन्ही पक्षांचे लोक सेटवर जातात खंडणी गोळा करतात...मनसे या लोकांना समोर आणेल


आम्हांला छेडलंय ना तर आता आम्हीही गप्प बसणार नाही, अमेय खोपकरांचा आरोप

लाचार हा शब्द ज्याला लागू होतो, तो व्यक्ती म्हणजे नारायण राणे, खासदार विनायक राऊतांची टीका

लाचार हा शब्द ज्याला लागू होतो..तो व्यक्ती म्हणजे नारायण राणे.. स्वतः पक्ष काढून दीड वर्षात लाचारी पत्करली.. उद्धवजी ठाकरे हे पण एक शिवसैनिकच..त्यांच्या रुपाने एक शिवसैनिकच मुख्यमंत्री झाला याचा अभिमान- खासदार विनायक राऊत 

कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा येत्या रविवारी आणि सोमवारी बंद

कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा येत्या रविवारी आणि सोमवारी बंद राहणार आहे...शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्याला गेल्या काही दिवसापूर्वी गळती लागली आहे....हे गळती काढण्याचे काम महानगरपालिकेकडून हाती घेतलं जाणार आहे.. त्यामुळे शिंगणापूर उपसा केंद्र देखील बंद ठेवावं लागणार आहे....परिणामी रविवार आणि सोमवार हे दोन दिवस ए,बी,सी, डी आणि ई वॉर्डातील पाणी पुरवठा खंडित होणार आहे... त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केलंय....

पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून एसआरपीएफ जवानाचा गोळीबार, बार्शी तालुक्यातील भातंबरे येथील घटना, एकाचा मृत्यू

पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून एसआरपीएफ जवानाचा गोळीबार, बार्शी तालुक्यातील भातंबरे येथील घटना


घटनेत एक जण जागीच ठार झाला असून दोघे या हल्ल्यात जखमी असल्याची माहिती, नितीन बाबुराव भोसकर असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव 


काल रात्री पावणे अकराची घटना, आरोपी जवान गोरोबा तुकाराम महात्मे यास अटक


गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल देखील पोलिसांकडून जप्त

आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहात दाखल

आर्यन खान आणि इतर दोघांचा जामीन अर्ज काल कोर्टानं फेटाळला, आज आर्यनची भेट घेण्यासाठी शाहरुख खान स्वत: आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संदर्भात मोठी घोषणा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संदर्भात मोठी घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार आहेत, ज्याचे नाव 'ट्रुथ सोशल' आहे. ट्रम्पचे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरसारखेच असेल, ज्यावर वापरकर्ते त्यांचे विचार, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतील. ज्यांनी माझ्यावर बंदी घातली अश्या बिग टेक कंपनींच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण ट्रुथ सोशल मिडीया तयार केल्याचं ट्रम्प यांनी सांगीतलं आहे. आम्ही अशा जगात राहतो जिथे तालिबान ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे, तरीही तुमचे आवडते अमेरिकन अध्यक्ष शांत बसले आहेत. अशी खोचक टीकाही ट्रम्पयांनी केली आहे. 

विनातिकीट प्रवास करणाऱ्या आणि कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांकडून 6 महिन्यांत 71 कोटी 25 लाखांचा दंड वसूल

मध्य रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणारे आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांकडून गेल्या 6 महिन्यांत 71 कोटी 25 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. दंडाची ही रक्कम भारतीय रेल्वेच्या इतर सर्व विभागांमध्ये सर्वाधिक असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत जवळपास साडेबारा लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आलीय. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ज्यांचे लसीकरण होऊन चौदा दिवस पूर्ण झाले आहेत अशा युनिव्हर्सल पास असलेल्या नागरिकांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक नागरिक लसीकरण पूर्ण झालेले नसताना देखील प्रवास करताना आढळून येतायेत. 

राज्यातील 27 जिल्ह्यांसह 23 मनपा क्षेत्रांमध्ये काल कोरोनामुळं एकही मृत्यू नाही

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत असल्याचं दिसत आहे. काल बुधवारी महाराष्ट्रातील तब्बल 27 जिल्हे आणि 23 महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोनामुळं एकही मृत्यू झाला नसल्याचं सरकारी आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. मुंबई उपनगरातील ठाणे जिल्ह्यासह सात उपनगरांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. तर नाशिक मंडळातील अहमदनगर जिल्ह्यात दोन आणि नाशिक शहरात दोन मृत्यू वगळता इतर जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. विदर्भातील एकाही जिल्ह्यात काल कोरोनामुळं कुणालाही जीव गमावावा लागलेला नाही. राज्यात काल 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल एकूण 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक 4 मृत्यू हे सातारा जिल्ह्यात झाले असल्याची नोंद आहे. 

नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर 'प्रहार'; मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेबांच्या तत्त्वांना तिलांजली, तर सत्तेसाठी हिंदुत्वाशी गद्दारी, अग्रलेखातून घणाघात

Narayan Rane On Cm Uddhav Thackeray : भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज त्यांच्या प्रहार या मुखपत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिलीत. आता तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद, असा प्रहार (Prahaar Newspaper) नारायण राणेंनी केला आहे. हिंमत असेल तर शिंगावर घ्या, असं आव्हानही राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे.  


राणेंच्या प्रहारमधून शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका


"मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा! हिंदू तितुका मेळवावा!! हिंदुस्थान धर्म वाढवावा!!!' की किती हा बोगसपणा? किती खोटारडेपणा?? किती ही बनवाबनवी??? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मुख्यमंत्री पद!!", असं नारायण राणे अग्रलेखातून म्हणाले आहेत. 

पार्श्वभूमी

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 25 तारखेपासून व्यापक लसीकरण मोहीम, उदय सामंतांची घोषणा


कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती, आता ती ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 

 

मंत्री सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनी ही सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थिती लावावी. महाविद्यालयांनीही विद्यार्थी-पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ऑनलाईन - ऑफलाईन परीक्षा, कोरोनानंतरच्या काळातील नोकरीच्या संधी अशा विविध विषयांवर उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी सुरक्षिततेची काय तयारी महाविद्यालयांनी केली आहे याची पाहणी त्यांनी केली आणि  आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.


नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर 'प्रहार'; मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेबांच्या तत्त्वांना तिलांजली, तर सत्तेसाठी हिंदुत्वाशी गद्दारी, अग्रलेखातून घणाघात


Narayan Rane On Cm Uddhav Thackeray : भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज त्यांच्या प्रहार या मुखपत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिलीत. आता तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद, असा प्रहार (Prahaar Newspaper) नारायण राणेंनी केला आहे. हिंमत असेल तर शिंगावर घ्या, असं आव्हानही राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे.  


राणेंच्या प्रहारमधून शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका


"मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा! हिंदू तितुका मेळवावा!! हिंदुस्थान धर्म वाढवावा!!!' की किती हा बोगसपणा? किती खोटारडेपणा?? किती ही बनवाबनवी??? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मुख्यमंत्री पद!!", असं नारायण राणे अग्रलेखातून म्हणाले आहेत. 


नारायण राणे यांनी अग्रलेखातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले की, "यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा आदर्श आत्मसात करून काम करीत असतात. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा ठेवता येत नाही. सध्या संजय राऊत नैराश्यामध्ये आहेत. त्या अवस्थेमधूनच ते उद्धव यांना सर्वांपेक्षा वरचढ दाखवायचे आणि नसलेले गुण त्यांच्या अंगी चिकटवून त्यांना कर्तबगार दाखवायचे, हे एकमेव काम करीत असतात. 'सामना'च्या याच अंकात 'फटकारे' या मथळ्याखाली '…" 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.