Breaking News LIVE : प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर सचिन सावंत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
Breaking News LIVE Updates, 19 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर सावंत आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. सावंत आणि मुख्यमंत्र्यामधल्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाली.
इयत्ता दहावी बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षा निकाल जाहीर झाला आहे
इयत्ता बारावी बोर्ड पुरवणी परीक्षा -
एकूण 12160 परीक्षेस प्रविष्ट झाले होते
त्यातील 3322 विद्यार्थी या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून
बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचा राज्याचा निकाल 27.31 आहे
दहावी बोर्ड पुरवणी परीक्षा
एकूण 10477 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यातील 3053 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
राज्याचा दहावी बोर्ड पुरवणी परीक्षेचा निकाल 29.14 आहे
पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी कसं जगायचं असा सवाल उपस्थित करत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत देखील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या जवळच असणाऱ्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादीचे युवकचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. जोपर्यंत ही दरवाढ कमी होत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करत राहणार अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली आहे.
नाशिक : फटाके विक्रेत्यांना दिलासा, पालिका महासभेआधीच फटाके विक्री बंदी मागे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनं सुटला तिढा
- विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 5 जिल्ह्यांना दिले होते निर्देश
- मात्र,भुजबळ यांनी साधला थेट प्रधान सचिव सीताराम कुंटे यासोबत संवाद
- अखेर उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात होणार फटाके विक्री
लखीमपूर घटनेनंतर महाराष्ट्रात आघाडी सरकारमधील घटक पक्षाने महाराष्ट्र बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला होता . आता आज विनायक पाटील या सामाजिक कार्यकर्त्याने या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या अस्थींचे चंद्रभागेमध्ये विसर्जन केले . यात कोणताही राजकीय हेतू नसून ज्या निरपराध शेतकऱ्यांना या घटनेचे मरण पत्करावे लागले त्यांना सद्गती मिळावी आणि त्यांचे अस्थींचे अंत्यदर्शन या भागातील शेतकरी वर्गाला घेता यावे यासाठी या अस्थी विसर्जनासाठी पंढरपूर मध्ये आणल्याचे विनायक पाटील यांनी सांगितले . आज सकाळी नऊ वाजता या अस्थी विठ्ठल मंदिराच्या बाहेरील नामदेव पायरी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या . यावेळी काही विठ्ठल भक्तांनी येथे भजन केल्यावर अस्थी चंद्रभागेच्या पात्रात सजवलेल्या होडीतून नेण्यात आल्या . येथे विनायक पाटील आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी या अस्थींचे चंद्रभागेमध्ये विसर्जन केले . गंगेपासून चंद्रभागेपर्यंत सर्वच पवित्र नद्यांमध्ये या अस्थींचे विसर्जन केले जात असल्याचे विनायक पाटील यांनी सांगितले .
काल कळमना परिसरात ज्या ठिकाणी उड्डाणपुलाचा काही भाग खाली कोसळला होता. त्या ठिकाणीच आज शिवसेनेच्यावतीने मोठं आंदोलन करण्यात येत आहेत...
एचबी टाऊन चौकाकडून कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती कडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे... काल रात्री साडेनऊच्या सुमारास उड्डाणपुलाचा एक भाग खाली कोसळला होता...
त्यानंतर शिवसेनेने नागपूर महानगरपालिकेत आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजप विरोधात आंदोलन सुरू केलंय...
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या विभागाचा काम योग्य नसून नागपुरात विविध रस्त्यांचे आणि उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेनेकडून हे आंदोलन केले जात आहे...
उस्मानाबाद मध्ये दगडफेक प्रकरणी 43 प्रमुख आरोपींसह 150 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 6 पोलीस जखमी झाले आहेत. कलम 307 सह अन्य 10 वेगवेगळ्या कलमांने गुन्हा नोंद , आरोपींचा शोध सुरू. उस्मानाबाद शहरातील विजय चौक भागात झालेल्या दगडफेक व पोलिसांवरील प्राणघातक हल्ला प्रकरणी 43 प्रमुख आरोपींसह 150 जणांवर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दगडफेकीत 6 पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम 307 सह अन्य 10 वेगवेगळ्या कलमांने गुन्हा नोंद करण्यात आला आहे , पोलिसांकडुन आरोपींचा शोध सुरू आहे.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये आज सकाळपासून कामगारांनी संप केला आहे. कामगारांचे तीन महिन्याचे पगार थकले आहेत. तसेच तीन वर्षांपासून त्यांचे रिटेन्शन थकलेले आहे. आज सकाळी आठ वाजता कामगारांची पहिली पाळी सुरू झाल्यानंतर सर्व कामगार आतमध्ये आले आणि ते बसून राहिलेले आहेत. जोपर्यंत आमचा प्रश्न सोडवला जात नाही, आमच्या खात्यावर पगार जमा होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे काम सुरू करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. जवळपास 850 कामगार संपावर गेले आहेत.. याबद्दल कारखाना प्रशासनाकडून कोणाचीही प्रतिक्रिया समजू शकली नाही.. हा कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे.
अहमदनगर -
नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांच्या कडून फटाके फोडण्यास बंदी....
मात्र अहमदनगरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध...
मनसेकडून रस्त्यावर उतरत फटाके फोडूनच केला निषेध...
फटाकेबंदी म्हणजे हिंदुत्वावर घाला मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे...
बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन....
फटाके बंदीचा आज होणार फैसला, नाशिक महापालिकेची आज ऑनलाइन महासभा
- फटाके बंदी करण्याबाबत महासभेत निर्णय घ्या विभागीय आयुक्तांच्या मनपाला सूचना
- विभागीय आयुक्तांच्या सूचनेला केराची टोपली दाखवायची की अंमलबजावणी करायची याबाबत आज होणार निर्णय
- हवेची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी फटाके उत्तर महाराष्ट्रात फटाके बंदी करण्याची सूचना
एक टन काचा अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू
कोल्हापूरजवळील नागाव येथील दुर्दैवी घटना
टेंपोत काचा भरत असताना क्रेनची तार तुटल्याने अपघात
संदीप खोरसे या टेंपोचालकाचा मृत्यू
कारखाना मालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई..
सायन परिसरातून जवळपास 21 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त..
एका ड्रग्स सप्लायर महिलेला अटक, राजस्थान,प्रतापगड परिसरातून मुंबई पोलिसांची टीम गेल्यानंतर करण्यात आली कारवाई..
सायन परिसरातून 7 किलो हेरॉईन ड्रग्स जप्त करण्यात आलं..
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वात घाटकोपर युनिटची कारवाई..
पार्श्वभूमी
College Reopen : कॉलेज कॅम्पस गजबजणार, राज्यात आजपासून महाविद्यालये सुरू
कोरोनामुळे राज्यासह देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. आजपासून राज्यभरातील कॉलेज सुरु होत आहेत. मात्र अनेक कॉलेजेसच्या एसओपी जाहीर होत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. मात्र आज औरंगाबाद आणि पुणे विद्यापीठानं संबंधित महाविद्यालयांच्या प्रशासनाला आदेश जारी केले आहेत. याशिवाय राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये आजपासून सुरू होणार आहे. 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं हिरवा कंदील दिला आहे. मात्र पुणे, औरंगाबाद विद्यापीठ, आणि कृषी विद्यापीठाकडून कालपर्यंत त्यासंदर्भातले आदेश महाविद्यालयांना मिळाले नव्हते. मात्र आज आदेश जारी केल्यानं विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे.
सेक्स टूरिझम रॅकेटचा भंडाफोड; मुंबई क्राइम ब्रांचची कारवाई, दोन महिला अटेकत, काय आहे सेक्स टूरिझम
मुंबई : मुंबई क्राइम ब्रांचनं एका रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या रॅकेटमध्ये महिलांना वेश्या व्यवसायात काम करायला लावलं जायचं. विशेष म्हणजे यात महिला ग्राहकांसह भारतभर फिरण्यासाठी जायच्या. टूरवर कपल म्हणून अशा महिलांना ग्राहकांसोबत पाठवलं जायचं. मुंबई क्राइम ब्रांचच्या यूनिट 7 ला अशी महिती मिळाली होती की, 2020 मध्ये वेश्या व्यवसायात अटक केलेली एक महिला आपल्या पार्टनरसह मिळून एका वेगळ्या प्रकारे रॅकेट चालवत आहे. यानंतर मुंबई एअरपोर्टवर क्राइम ब्रांचच्या टीमनं ट्रॅप लावत दोन महिलांना अटक केलं आणि अन्य दोन महिला ज्यांना या व्यवसायात ढकललं जात होतं त्यांना ताब्यात घेत शेल्टर होममध्ये पाठवण्यात आलं आहे.
काय होती मोडस ऑपरेंडी?
ही लोकं ग्राहक शोधायची. त्यांना ग्राहक मिळला आणि डील फायनल झाली की, महिलांसोबत भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर पोहोचवायचे. यात गोवा या लोकांची सर्वाधिक पसंती होती. संबंधित रॅकेट चालवणारे लोक ग्राहकांना आधी मुलींचे फोटो पाठवायचे. मुलगी पसंत आल्यानंतर ग्राहकांना गोवा किंवा ठरलेल्या ठिकाणापर्यंत फ्लाईटचं स्वत:चं तिकिट बुक करावं लागायचं. हे लोक ग्राहकांकडून दोन दिवसांचे 50 हजार रुपये घ्यायचे, जे एक्स्क्लुझिव्ह सेक्ससाठी घेतले जायचे. अटक केलेले आरोपी त्या मुलींकडून 20 टक्के कमिशन घ्यायचे. ज्यानंतर ग्राहक त्यानं पसंत केलेल्या मुलीला घेऊन दोन दिवसांसाठी गोव्याला जायचे आणि नंतर मुंबईत परतायचे.
कसं पकडलं रॅकेट
क्राइम ब्रांचनं या प्रकरणात दोन महिलांना अटक केलं आहे. यातील एकीचं नाव आबरुन अमजद खान उर्फ सारा तर दुसरीचं नाव वर्षा दयालाल असं आहे. क्राईम ब्रांचनं सांगितलं की, ज्यावेळी याबाबत माहिती मिळाली त्यावेळी एक डुप्लिकेट ग्राहक तयार केला ज्यानं महिलांशी संपर्क केला आणि त्यांचा विश्वास जिंकण्यानंतर मुलींची मागणी केली. त्यानंतर गोव्याची तिकिटं देखील बुक केली. यानंतर ज्यावेळी त्या महिला एअरपोर्टवर पोहोचल्या त्यावेळी PSI स्वप्निल काळे आणि त्यांच्या टीमनं तीन महिलांना अडवलं आणि चौकशीनंतर ताब्यात घेतलं. चौकशीनंतर माहिती मिळाली की, यांची चौथी साथीदार असलेल्या महिलेनं बोर्डिंग पास घेतला आहे. त्यानंतर पीआय एम श्रीधनकर आणि पीआय प्रिया थोरात सीआयएसएफ यांच्या मदतीनं त्या महिलेला एअरपोर्टमधून बाहेर काढत ताब्यात घेतलं. त्यावेळी तिनं या प्रकरणाची कबुली दिली. त्या महिलेनं सांगितलं की, मुंबईत पोलिसांची छापेमारी खूप वाढली आहे. त्यामुळं मुलींना काम करायला भीती वाटते. त्यामुळं गोवा किंवा अन्य पर्यटनस्थळांवर फिरायला पाठवलं जायचं, जेणेकरुन कुणाला संशय येऊ नये.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -