Breaking News LIVE : जाणून घ्या दिवसभराच्या बातम्या एका क्लिकवर...
Breaking News LIVE Updates, 19 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
मंदाकिनी खडसे यांच्यावरील कारवाई आकस बुद्धीने करण्यात आल्याचे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी ईडी-इन्कम टॅक्स- सीबीआयचा केंद्र सरकार अतिरेकी वापर करत असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाने हा डाव त्यांच्यावरच उलटेल हे लक्षात घ्यावे असा इशारा ही दिला. या यंत्रणाच्या भरवशावर सरकार बनवू शकत नाही असे मत त्यांनी मांडले. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज समता परिषद मेळाव्यासाठी चंद्रपुरात आले असतांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे
नवी मुंबई महापालिकेने आपल्या क्षेत्रातील 100 टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केलाय. 100 टक्के लसीकरण करणारी नवी मुंबई महापालिका एमएमआर क्षेत्रातील पहिली महापालिका ठरली आहे. तर राज्यातील दुसरी महापालिका ठरली आहे. 18 वर्षांवरील 11 लाख 7 हजार 233 नागरिकांना कोव्हिड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. पहिल्या डोस सोबत दुसरा डोस ही 52 टक्के नागरिकांना देऊन झालंय. ज्या व्यक्तींचा विविध सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणावर लोकसंपर्क येतो असे मेडिकल स्टोअर, हॉटेल, सलून, ब्युटी पार्लर, पेट्रोल पम्प, टोल नाका तसेच घरोघरी गॅस वितरण करणारे कर्मचारी, घरकाम करणारे महिला व पुरूष कामगार, ऑटो / टॅक्सी वाहनचालक, सोसायटी वॉचमन अशा कोरोनाच्या दृष्टीने जोखमीच्या व्यक्ती यांच्याकरता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. बेघर, निराधार व्यक्ती, तृतीयपंथीय यांच्याकरता तसेच कॉरी क्षेत्र आणि रेडलाईट भागातही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अंथरूणाला खिळलेल्या बेडरिडन व्यक्तींसाठी घरी जाऊन लसीकरण करण्यात आल्याने नवी मुंबई महापालिकेला 100 टक्के लसीकरणाचा टप्पा पार करत आलं असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलंय.
राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाची मान्यता. यासंदर्भातील कार्यपद्धती व नियम जाहीर
भारतीय रेल्वेच्या मालकीची कंपनी असलेल्या आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग आणि टूरिझम कॉर्पोशनने (Indian Railway Catering and Tourism Corporation - IRCTC) एक नवा विक्रम केला आहे. या कंपनीचं शेअर बाजारातील भांडवली बाजार मूल्य (market capitalization) एक ट्रिलियन पर्यंत म्हणजे सोप्या मराठीत एक लाख कोटींपर्यंत पोहोचलं आहे.
सलग तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडात कहर माजला आहे. या पावसामुळे उत्तराखंडाचं जनजीवन विस्कळीत झालं असून मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. पावसामुळे राज्यात आतापर्यंत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईच्या मानवलोक संस्थेचे अनिकेत लोहिया यांची कन्या ईशा लोहिया हिने एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला आहे. सोमवारी तिने ही कामगिरी केली. समुद्र सपाटी पासून १८५१३ फूट ऊंचीवर (५३६४ मीटर) असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पवर ती पोहोचली आहे. ईशा लोहिया ही दक्षिण (काठमांडू) कॅम्पसाठी सहभागी १६ जणांच्या पथकात सर्वात कमी वयाची कॅम्पर आहे.
कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी दुधाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत म्हशीच्या दुधाच्या दरात 14 ते 20 तर गाईच्या दुधामागे 10 ते 14 रुपयांची वाढ झाली आहे. आज नाशिक शहरात म्हशीचे दूध 80 रुपये तर गाईचे दूध 50 रुपये लिटर आहे
कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी दुधाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत म्हशीच्या दुधाच्या दरात 14 ते 20 तर गाईच्या दुधामागे 10 ते 14 रुपयांची वाढ झाली आहे. आज नाशिक शहरात म्हशीचे दूध 80 रुपये तर गाईचे दूध 50 रुपये लिटर आहे
पार्श्वभूमी
राज्यातील साखर कारखानदारीच्या मुद्द्यावर आज देवेंद्र फडणवीस अमित शाहांना भेटणार
सहकाराच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीत एक महत्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले काही भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहेत. देशाचे नवे सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या क्षेत्रासाठी केंद्र सरकारचे नेमके धोरण काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवरती ही महत्त्वाची बैठक आज होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील हे नेते असणार आहेत.
दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या या बैठकीसाठी सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना देखील हजर राहण्यास सांगितले गेले आहे. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना जवळपास दहा हजार कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस इन्कम टॅक्स खात्याने नुकतीच पाठवली आहे. त्याबाबत कारखान्यांना दिलासा मिळावा अशी सुद्धा मागणी या शिष्टमंडळाकडून केली जाणार असल्याचं कळत आहे. याशिवाय कारखान्यांची दीर्घ मुदतीची कर्जे पुनर्गठित करण्यात यावीत, निर्यात सबसिडी वाढवून मिळावी या संदर्भातल्या देखील मागण्या या शिष्टमंडळाकडून सहकार क्षेत्रासाठी केल्या जाणार आहेत.
मराठी भाषेत पदवी प्राप्त मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढ मिळणार; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर शासनाने परिपत्रक काढण्यात आले असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा 100% वापर व्हावा त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेचे व्यवहार जास्तीत जास्त सोप्या, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावेत आणि मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मराठी भाषा विषयांमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत मुंबई महापालिकेने ठराव मंजूर केलेला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी 2015 पासून पुढे बंद होती. त्यामुळे त्यानंतर पदवी मिळवणारे पालिका कर्मचारी या वेतनवाढीपासून वंचित होते. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी 2016 ते 2018 पर्यंत पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना देखील मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.
Maharashtra Unlock : हॉटेल्स आणि दुकानांच्या वेळा वाढविणार, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय
यंदाची दिवाळी बऱ्याच अंशी निर्बंधमुक्त साजरी करता येणार आहे. कारण कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्यामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोरोना टास्कफोर्ससोबत बैठक झाली यावेळी हॉटेल आणि दुकानांची वेळ मर्यादा वाढवण्याचा निर्णय झाला, 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपट गृहं, नाट्यगृहांसोबत अम्यूझमेंट पार्कही सुरू होणार आहेत. तसंच दुकानांच्या वेळा वाढवून देण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत.
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील वॉटर पार्कशिवाय अन्य उपक्रमांना परवानगी देण्याचे ठरले. पार्क्स मधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्र्याचं शासकिय निवासस्थान वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या वेळी लहान मुलांच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. तसेच कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकूनगुन्या यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -