Maharashtra Covid 19 LIVE Updates : भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली; तीन मजुरांचा मृत्यू तर तीन जण जखमी 

Maharashtra Corona cases Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील.देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Apr 2021 06:40 AM

पार्श्वभूमी

मुंबईतील हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यताहाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.  केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने...More

भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली; तीन मजुरांचा मृत्यू तर तीन जण जखमी 
भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे . या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत . राजू उर्फ रणछोड प्रजापती ( वय ५० वर्ष ), भगवान मामा ( वय ५५ वर्ष ), मनसुख भाई ( वय ४५ वर्ष ) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नवे आहेत .   भिवंडी तालुक्यात काटई ग्राम पंचायत हद्दीत देवानंद कंपाउंड येथे हा धोकादायक यंत्रमाग कारखाना होता . कारखान्याच्या भिंती जीर्ण झाल्याने हा यंत्रमाग कारखाना मागील चार दिवसांपासून बंद होता व कारखान्याच्या जीर्ण झालेल्या भिंतींच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. गवंडी कामगार व मजुरांच्यामार्फत हे काम सुरु होते . यावेळी भिंतीचे काम करण्यासाठी मजुरांनी परांची देखील बांधली होती. त्यावर काम सुरु होते . मात्र हे काम सुरु असतांनाच लोखंडी अँगल व पत्राचा भार जीर्ण भिंतींवर पडल्याने भिंत कोसळली व त्यासोबतच छताचे लोखंडी अँगल व पत्रा देखील खाली कोसळला . या दुर्घटनेत तीन बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत . या घटनेची नोंद निजामपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.