Coronavirus Update News, Breaking News LIVE : सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुढे ढकलल्या

Coronavirus Update News, Maharashtra Lockdown, Breaking News LIVE Updates, 27 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Apr 2021 07:35 AM
यवतमाळ शहरातील कोविड डेडीकेटेट शाह हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड

यवतमाळ शहरातील कोविड डेडीकेटेट शाह हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड,  घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील कविता धनराज चव्हाण ह्या कोरोना बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिची प्रकृती चिंताजनक होती, यात रुग्णालयातील नर्स स्टाफने रुग्णाचे ऑक्सिजन मास्क काढल्याने रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली, पोलीस घटनास्थळी दाखल ..

त्या लोको पायलटच्या कार्याची नोंद अखेर मध्य रेल्वेने घेतली

त्या लोको पायलटच्या कार्याची नोंद अखेर मध्य रेल्वेने घेतली, विनोद जांगीड यांचा आज मध्य रेल्वेच्या डीआरएम यांच्याकडून सत्कार करण्यात आला, एबीपी माझाने यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर मध्य रेल्वेने केला सन्मान, विनोद हे वांगणी इथे झालेल्या घटनेतील एक्सप्रेसचे लोको पायलट होते, त्यांनी प्रसंगावधान आणि समयसूचकता दाखवून इमर्जन्सी ब्रेक्स लावल्याले, त्या लहान मुलासोबत, मयूर शेळके आणि त्या एक्सप्रेस मधील प्रवासी देखील सुरक्षित राहिले.

सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुढे ढकलल्या

सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुढे ढकलल्या


21 आणि 22 मे पासून सीए फायनल आणि इंटरमिडीएट अभ्यासक्रम परिक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत 


परीक्षेच्या नव्या वेळापत्रकाची नोटीस परीक्षेच्या 25 दिवस आधी संकेतस्थळावर जाहीर केले जाईल

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवण्यासाठी पंकजा मुंडे यांचे अजित पवारांना पत्र

 


रेमडेसिवीर इंजेक्शनचा बीडमध्ये सर्रास काळाबाजार होत असून या इंजेक्शनचा वापर विशिष्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते स्वतःच्या कार्यालयातून करत असल्याचा गंभीर आरोप पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांना दिलेल्या पत्रात केला आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नावावर हे इंजेक्शन प्रशासनाकडून ताब्यात घेतले जात आहे यावेळी चुकीच्या पद्धतीने डॉक्टरांच्या सह्या इंजेक्शनच्या मागणीसाठी घेतल्या जात आहेत असे सुद्धा पंकजा मुंडे याने पत्रामध्ये म्हटले आहे. डॉक्टर दहशतीखाली काम करत असल्यामुळे ते यावर बोलू शकत नाही. मात्र मी यावर आवाज उठवणार आहे कोरोनाची लस असो की रेमडेसिवीर इंजेक्शन हे कोणाचीही मक्तेदारी नाही. त्यामुळे कुणीतरी आपल्या पक्षाच्या कार्यालयातून ते वाटणे चुकीचा असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

राज्य टास्क फोर्ससाठी महसूल विभागातून पाच विशेष अधिकाऱ्याची नेमणूक

राज्य टास्क फोर्ससाठी महसूल विभागातून पाच विशेष अधिकाऱ्याची नेमणूक


एक अप्पर जिल्हाधिकारी आणि चार उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश यात समावेश. कोरोना व्यवस्थापनात राज्यातील रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर आणि इतर औषधांचा पुरवठा सुरळीत आणि गतीने करण्यासाठी नेमणूक. राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. हे अधिकारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवतील. या महत्वाच्या बाबींमध्ये सुसूत्रता राहावी यासाठी नेमणूक.

रत्नागिरी : चिपळूण पश्चिम पूर्व भागात अवकाळी पाऊस

रत्नागिरी : चिपळूण पश्चिम पूर्व भागात अवकाळी पाऊस,  अलोरे;शिरगाव;कुंभार्ली घाट विजांच्या कडकडासह पावसाच्या हलक्या सरी

राज्यातील कोविड परिस्थितीवर हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची सूमोटू याचिकेवर आज परत सुनावणी

राज्यातील कोविड परिस्थिती आणि खास असंतुलित औषधे वाटपावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची सूमोटू याचिकेवर आज परत सुनावणी झाली आहे.

अंबाजोगाईमध्ये 22 मृतदेहांची अवहेलना झाल्यानंतर आता पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

अंबाजोगाई मध्ये 22 मृतदेहांची अवहेलना झाल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


22 मृतदेह अगदी सामनासारखे एका रुग्णवाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले हे अतिशय वेदनादायी असून हा प्रकार माझ्याच बीड जिल्ह्यात घडला असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.


बीड जिल्ह्यावर सध्या शासन अत्याचार करत असून त्यामुळे प्रशासनाने हात टेकले आसून सध्याची परिस्थिती बीड जिल्ह्याच्या भविषयसाठी अतिशय भयानक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी बीड जिल्ह्यच्या प्रशासनावर जातीने लक्ष देण्याची विनंती देखील त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

महाबळेश्वर पाचगणीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

महाबळेश्वर पाचगणीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. स्ट्रॉबेरी, तुतू पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान. साताऱ्यातही विजेच्या कडकडाटासह पाऊसाच्या सरी.

परभणी : महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेश लोंढे यांचे कोरोनाने निधन

 


परभणीतील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता राजेश लोंढे यांचे आज पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. या आठवड्यात जिल्ह्यात 2 मोठ्या अधिकाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. याच आठवड्यात जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचेही कोरोनाने निधन झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

ट्रकचालकांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक 

हिंगोली,वसमत,नांदेड या ठिकाणी ट्रक चालकांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला हिंगोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल तीन लाख 89 हजारांचे 35 महागडे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. महामार्गावर वाहतूक करणारे ट्रक चालक रात्री धाब्यावर थांबुन ते झोपी गेल्यानंतर झोपी गेल्याचा फायदा घेत हे चोरटे ड्रायव्हर आणि क्लीनर यांचे मोबाईल लंपास करून ते विकत होते याची माहिती हिंगोली पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून सुनील खिल्लारे,कैलास शिंदे यांना अटक केली आहे..

ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या महिलेने मारली उडी

ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या महिलेने उडी मारली. दीप्ती काळे असे या महिलेचे नाव आहे. दीप्ती काळे आणि तिच्या टोळीवर पुणे पोलिसांनी आजच मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. काही दिवसापूर्वी विश्रांतवाडी पोलिसांनी तिला एका गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.

नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील पश्चिम भागात पावसाची हजेरी

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील मुल्हेर, हरणबारी, मालवाडी, जेतापूर या परिसरात चार वाजेच्या दरम्यान मध्यम स्वरुपाच्या पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसाने शेतक-यांची चांगलीच धावपळ झाली असून पावसामुळे कांदा खराब तर होणार नाही ना अशी भिती व्यक्त होत आहे.

यवतमाळ : वणीत सॅनिटायझर प्यायल्याने आणखी एकाचा मृत्यू

यवतमाळ : वणीत सॅनिटायझर प्यायल्याने आणखी एकाचा मृत्यू, शहरातील माळीपुऱ्यात राहणारा राजू गोलाईत वय 47 याचा सॅनिटायजर प्यायल्याने मृत्यू, विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वीच वणी येथील 7 व्यक्तीचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाला होता

चंद्रपूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या पत्रपरिषदेत आंदोलक महिलांचा आक्रोश

चंद्रपूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या पत्रपरिषदेत आंदोलक डेरा महिलांचा आक्रोश, पत्रपरिषद संपल्यावर नियोजन भवनात आधीच बसलेल्या 2 आंदोलक महिलांनी ओरडून मांडली व्यथा, गेले 77 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वैद्यकिय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी मुलाबाळासोबत करत आहेत डेरा आंदोलन, पहिल्या लाटेपासून 560 कर्मचाऱ्यांचे वेतन आहे थकीत, आंदोलक महिलांनी रडून रडुन व्यथा मांडल्यावर देखील मंत्री देशमुख, वडेट्टीवार यांनी पाठ फिरवत सभागृहातुन काढता पाय घेतला, मंत्री देशमुख यांनी या आंदोलनावर भाष्य करताना कोविड काळात हे आंदोलन कसे करू शकता? असा उलटा विचारला होता सवाल

मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील : अजित पवार

मुंबई : केंद्र सरकारनं 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. अशातच सध्या राज्यात मोफत लसीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. यासंदर्भात बोलताना उद्या कॅबिनेट बैठकीत चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. मोफत लसीकरणाच्या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाली आहे, पण यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असंही यावेळी बोलताना अजित पवार यांनी सांगितलं. ज्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडतो, त्यासंदर्भातील कोणताही निर्णय फक्त आणि फक्त मुख्यमंत्रीच घेऊ शकतात, असं अजित पवार यांनी सांगितलं. 

लसीकरणासाठी महापालिका सज्ज, मात्र लसींचा पुरवठा होणं गरजेचं : महापौर किशोरी पेडणेकर

लसीकरणासाठी महापालिका सज्ज, मात्र लसींचा पुरवठा होणं गरजेचं असल्याचं मतं महापौरांनी व्यक्त केलं आहे. तसेच प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र तयार करु शकतो. मुंबईकरांनी नोंदणी न करता लसीकरण केंद्रांवर जाऊ नका असं आवाहान देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे

राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतून प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणार आणखी महिनाभराचा कालावधी

राज्यातील चार औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतून प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मितीसाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पारस, परळी, खापरखेडा आणि कोराडी या चार औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून ऑक्सिजन निर्मितीचा निर्णय घेतला आहे. सर्वात मोठी समस्या असलेल्या कॉम्प्रेसर खरेदीची निविदा प्रक्रिया आणि इतर गोष्टी पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

कुंभमेळ्यावर आक्षेप घेतो तर, या राजकीय कुंभमेळ्यावरही आक्षेप- संजय राऊत

निवडणुकांमुळेच कोरोनाचा प्रसार झाला, हे सत्य आहे. कुंभमेळ्यावर आक्षेप घेतो तर, या राजकीय कुंभमेळ्यावरही आक्षेप असल्याचं म्हणत निवडणुकांसंदर्भातील टीपण्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांभीर्यानं घेतील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. 

रेमडेसिवीर वाटपात नाशिकवर अन्याय होत असल्याचा आरोप


भाजपच्या खासदार भारती पवार यांचे मुख्यमंत्री, अन्न औषध प्रशासन मंत्रीना पत्र. लोकसंख्येच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्या अधिक असूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही. तुरळक पुरवठा मिळतो तो पुरेसा नाही, हे मुद्दे मांडत रेमडेसिवीरचं न्याय वाटप करण्याची खासदारांची राज्य सरकारकडे मागणी

कोल्हापूर-मुंबई धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस आजपासून रद्द, तर कोल्हापूर-अहमदाबाद विमान सेवा देखील स्थगित

कोल्हापूर-मुंबई धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस आजपासून रद्द करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी संख्या कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून पुढचे 13 दिवस महालक्ष्मी एक्स्प्रेस सेवा नाही. अहमदाबाद विमानतळावर काम सुरु असल्याने कोल्हापूर-अहमदाबाद विमान सेवा देखील स्थगित करण्यात आली आहे. पुरेसे प्रवाशी असतील तरच कोल्हापूर-तिरुपती विमानाचे टेक ऑफ होईल. 

नाशिकमध्ये मनपा रुग्णलयात अनावश्यक गर्दी करणाऱ्या नातेवाईकावर होणार कारवाई

मनपा रुग्णलयात अनावश्यक गर्दी करणारया नातेवाईकावर होणार कारवाई. डबा देण्यासाठी किंवा इतर करण्यासाठी घुटमळणार्यावर पहिल्यावेळी 1 हजार आणि दुसऱ्यांदा आढळला तर 5 हजार रुपये दंड आकारला जाणार

सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स; फोन टॅपिंग प्रकरणी सायबर सेल जबाब नोंदवणार

सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांचे समन्स; फोन टॅपिंग प्रकरणी सायबर सेल रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवणार, इतर काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांनाही चौकशीला बोलण्याची शक्यता

नागपूर : जिल्ह्यातील नागपूरमधील महालगाव कापसी परिसरात एका लाकूड कारखान्यात मोठी आग

नागपूर : जिल्ह्यातील नागपूर भंडारा रोडवरील महालगाव कापसी परिसरात एका लाकूड कारखान्यात मोठी आग लागली आहे. रात्री अकराच्या सुमारास ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या सात गाड्या आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप आग नियंत्रणात आलेली नाही. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या लाकूड कारखान्यात मोठ्या प्रमाणावर लाकूड साठा असल्यामुळे आग तीव्रतेने पसरली आहे. दरम्यान परिसरातील लोकवस्ती या ठिकाणापासून लांब असल्यामुळे कुणाच्याही जीविताला धोका नसल्याचं अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले आहे.



पार्श्वभूमी

Maharashtra Vaccination : महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण


मुंबई : कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. कालच्या लसीकरणाच्या अंतीम आकडेवारीत वाढ होऊ शकते. 3 एप्रिलला  4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आज राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे अभिनंदन केले आहे.
 
लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे 1 कोटी 48 लाखांच्या आसपास ही संख्या होत आहे. उद्याच्या लसीकरणांनंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.


गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांपेक्षा महाराष्ट्र पुढे असून आज (26 एप्रिल)  राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 6155 लसीकरण केंद्र होते. त्यामध्ये 5347 शासकीय आणि 808 खासगी केंद्रांचा समावेश आहे.  कोरोना प्रतिबंधात्मक  लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी  सांगितले. राज्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता. 


एमबीबीएसच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्गाच्या परीक्षा जूनमध्ये होणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख


नागपूर : एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या ज्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या होत्या त्या जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.एमडीची परीक्षा आम्ही घेतली आहे.  मात्र, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी त्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या असेही देशमुख म्हणाले.


राज्यात कोरोनाची दुसरी लाट अभूतपूर्व आहे. त्याचे व्याप चार पटीने जास्त आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येणं स्वाभाविक आहे. मात्र आता 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत आहे आणि स्थिती सुधारत आहे हे संकेत दिलासादायक असून लॉकडाऊनचे सकारात्मक संकेत असल्याचे देशमुख म्हणाले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.