Breaking News LIVE : राजधानी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात

Breaking News LIVE Updates, 18 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 18 Oct 2021 10:22 AM
"एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगाही काढणार" : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये भारतीय जवानांची सलग आठव्या दिवशी दहशतवाद्यांशी चकमक सुरु

बीड काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदींचा काँग्रेसला रामराम, राष्ट्रवादीत प्रवेश करणार

बीड काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. येत्या 21 तारखेला मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राजकिशोर मोदी हे मोजक्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत..


एकीकडे रजनी पाटील यांना राज्यसभेवर खासदार करून बीड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न पक्षाकडून होत असतानाच राजकिशोर मोदी यांनी मात्र काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलाय.. राजकिशोर मोदी यांच्या ताब्यात मागच्या तीस वर्षापासून अंबाजोगाई नगरपालिका आहे.. आता मोदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद मोदींमळे नक्कीच वाढणार आहे

कोगनोळी-कागल-इचलकरंजी एसटी सेवा झाली सुरू 

सीमाभागातील प्रवासी आणि नागरिकांना काहीसा दिलासा


कोगनोळी-कागल-इचलकरंजी एसटी सेवा झाली सुरू 


कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद होती महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य एसटी सेवा


महाराष्ट्र कर्नाटक एसटी सेवा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू नाही


मात्र प्राथमिक टप्प्यात कोगणोळीतुन एसटी सेवेला झाली सुरवात 


अनेक दिवसांनी आलेल्या एसटी बस कोगनोळी ग्रामस्थांनी केलं स्वागत

राजधानी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात

राजधानी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात


आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक


जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक


महाराष्ट्रातून विनोद तावडे पंकजा मुंडे सुनील देवधर बैठकीसाठी उपस्थित..

शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचं एकमत, माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका


शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचं एकमत


माजी खासदार राजू शेट्टी यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका


एफआरपीचे तुकडे पाडण्यासाठी दोन्ही नेत्यांची भाषा एक


पवार साहेबांना कारखान्याचे कर्ज दिसत तर शेतकऱ्यांनी काढलेलं कर्ज यांना दिसत नाही का?

दुर्गादेवी विसर्जनाला गेलेले दोघेजण कुरणखेडच्या काटेपूर्णा नदीत बुडाले

दुर्गादेवी विसर्जनाला गेलेले दोघेजण कुरणखेड येथील काटेपूर्णा नदीत बुडालेले दोन्ही मृतदेह सापडलेत. सुनिल वाघाळकर आणि अभिषेक वाघाळकर अशी मृतक भावांची नावे. दोघेही अकोल्यातील शिवसेना वसाहत भागातील राहणारे. कुरणखेड येथील चंडिका माता आपात्कालीन बचाव पथक आणि वंदे मातरम आपत्कालीन बचाव पथकाने शोधमोहीम राबवित मृतदेह शोधलेत.

बुलढाण्यात मुसळधार पाऊस; नदी-ओढ्यांना पूर

Buldhana News : दोन दिवसांपासूनच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक नदी ओढ्याना पूर आले असून जिल्ह्यातील पूर्णा नदीला पुन्हा एकदा महापूर आला असून नदी लगतच्या शेतीत पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यातील अनेक प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने पूर्णा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

Sindhudurg Airport : कोल्ह्यानं रोखलं चिपी विमानतळावर विमानाचं लँडिंग
Sindhudurg Airport : सिंधुदुर्ग विमानतळ सुरु झाल्यानंतर या विमानतळावर असा एक प्रसंग आला की मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली. त्याचं असं झालं धावपट्टीवर कोल्हा आला होता. हा कोल्हा धावपट्टीवर असल्याचे विमानाच्या पायलटला समजले. त्यांनी तात्काळ विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढण्यास सांगितले. या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्या नंतर दहा मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले. याबाबत प्रवाशांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

 

चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाच्या आजूबाजूला कोल्ह्यांचा कळप आहे आणि हे कोल्हे आपल्या भक्षकासाठी फिरत असतात दरम्यान विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावर पहिल्यांदाच कोल्ह्याचे दर्शन झाले. विमानसेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी या धावपट्टीवर कोल्ह्यांचा वावर दिसला मुंबईवरून सिंधुदुर्ग विमानतळावर उतरणाऱ्या विमानाच्या पायलटला धावपट्टीवर प्राणी असल्याचे निदर्शनास आले हे विमान धावपट्टीवर न उतरता पायलटने पुन्हा विमान आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला धावपट्टीवर कोणता तरी प्राणी असल्याचे सांगितले तात्काळ सुरक्षा यंत्रणेकडून धावपट्टीवर पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास कोल्हा असल्याचे दिसून आले या सुरक्षा यंत्रणेने कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढले त्यानंतर दहा मिनिटांनी या धावपट्टीवर हे विमान उतरविण्यात आले मात्र याची चर्चा प्रवाशांमध्ये चांगलीच रंगली होती या विमानतळाच्या सर्व बाजू संरक्षण भिंतीने बंदिस्त केले आहेत तरी हा कोल्हा कोणत्या मार्गाने धावपट्टीवर आला याचा शोध मात्र सुरक्षा यंत्रणा घेत आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात भीषण अपघात, भरधाव टेम्पोच्या धडकेत सहा वाहनांचा अपघात, तीन प्रवाशांचा मृत्यू

मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात भीषण अपघात, दोन टेम्पो, कार, खाजगी बस आणि ट्रेलरचा अपघात, भरधाव टेम्पोच्या धडकेत सहा वाहनांचा अपघात, तीन प्रवाशांचा मृत्यू, सहा प्रवासी जखमी  

पार्श्वभूमी

Mumbai Corona Update : दिलासादायक... मुंबईत काल 'शून्य' कोरोना मृत्यू; तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1214 दिवसांवर
Mumbai Corona Update : देशासह राज्यातीलही कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावताना पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आकडेवारी यामागील प्रमुख कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काल (रविवारी) राज्यात 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद (Coronavirus) झाली. तर  2 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, काल देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच संपूर्ण राज्याचा विचार केला तर तुलनेनं मुंबई शहरात सर्वाधिक दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद केली जात होती. अशातच कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पहिल्यांदाच मुंबईत कोरोनाची झीरो डेथ नोंदवण्यात आली आहे. 



मुंबईत गेल्या 24 तासात 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासांत 367 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,27,084 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या मुंबईत 5030 सक्रिय रुग्ण आहेत. तर मुंबईचा रुग्ण दुपटीचा दर 1214 दिवसांवर गेला आहे.


Mumbai Corona : जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये लसीकरणाचा मोठा फायदा, मुंबईत डेल्टा व्हेरीयंट जवळपास निष्प्रभ
काल मुंबईत कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर पहिल्या लाटेतील सुरुवातीचे काही दिवस वगळता दीर्घकालानंतर मुंबईत प्रथमच कोरोनाची झीरो डेथ फीगर आली. मोठा दिलासा देणाऱ्या या बातमीसह आणखी एक चांगली बातमी काल समोर आली आहे. ती आहे जीनोम सिक्वेसिंगसंदर्भातील. जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये लसीकरणाचा फायदा होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.  50 टक्के डेल्टा व्हेरीयंट असूनही गंभीर रुग्णाचं प्रमाण कमी आहे. मुंबईत डेल्टा व्हेरीयंट जवळपास निष्प्रभ होत असल्याचं समोर आलं आहे.  
नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग करणारी वैद्यकीय यंत्रणा महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेने आजवर दोन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता तिसऱ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. तिसऱ्या तुकडीमध्ये एकूण 343 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे 54 टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे 34 टक्के तर इतर प्रकारांचे 12 टक्के रुग्ण आढळले आहेत. कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोविड लस घेणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक निर्देशांचे कठोरपणे पालन करणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


किरण गोसावीने आणखी दोघांना फसवले, गुन्हा दाखल, कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 
पालघर : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Party )शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) अटक प्रकरणात एनसीबीने (NCB) साक्षीदार बनविलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) विरोधात एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर केळवे सागरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर निघाले आहेत. जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष तरे व आदर्श किणी ह्या दोन तरुणांना मलेशिया येथें नोकरी देतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपयेची रक्कम गोसावी यांनी बँक खात्यामार्फत घेतली होती. त्याच्या नवी मुंबई येथील के पी इंटरप्राईजेस या कार्यालयातून तो आपली सूत्रे हलवत होता. या दोन मुलांना तिकीट आणि व्हिसा दिल्यानंतर ते विमानतळावर गेल्यावर तिकीट आणि व्हिसा बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर दोन्ही तरुणांनी केळवे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तरुणांकडे असलेले भक्कम पुरावे पाहता आरोपी किरण गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्य न दाखविल्याने त्या दोन्ही तरुणांचा तक्रारी अर्ज केळवे पोलीस ठाण्यात धूळ खात पडून होता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.