पंढरपूर : एकनाथ खडसे हे सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करीत आहे. मात्र, ब्राह्मण हेही बहुजन असल्याने फडणवीस बहुजन आहेत, असा जावई शोध केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लावला आहे. आज पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आले असता ते बोलत होते.
फडणवीस यांनी अतिशय चांगल्या रितीने काम केले असे सांगताना भाजपने ज्येष्ठांना विश्रांती देत तरुणांना संधी दिल्याने खडसे यांना बाजूला ठेवले होते. खडसे यांना एखादे मंत्रिपद मिळेल मात्र त्यांच्या मागे कोणीही जाणार नाही, असे आठवले यांनी सांगितले. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत घेतल्याने फडणवीस यांची आणि आमची तोंडे बंद होणार नाहीत, असे सांगत खडसे यांच्यामुळे काही फरक पडत नसल्याचे आठवले म्हणाले.
खडसेंनी ठोकला राम राम, पण भाजपात खदखद कायम?
राज ठाकरे यांच्याशी भाजप युती करेल असे वाटत नाही. त्यांच्या युतीमुळे आमची मते कमी होतील असे सांगितले. कंगना रनौत हिच्या वक्तव्यामुळे तिच्यावर न्यायालयाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. एक अभिनेत्री म्हणून आम्ही तिला पाठिंबा दिला होता, असे आठवले यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दारुडा म्हणणारे प्रकाश आंबेडकरच दारुडे असल्याचा घणाघाती आरोप मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
... म्हणून राष्ट्रवादीतच जाण्याचा निर्णय घेतला, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण
मंत्री आठवले यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्तांची भेट
अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गुरुवारी नुकसानग्रस्तभागाचा दौरा केला.
Devendra Fadnavis | खडसेंनी धक्का दिल्यानंतर आता फडणवीसांचं सोशल इंजिनीअरिंग