जालना: मोबाईल बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जालन्यात मोबाईल बॅटरीशी खेळताना स्फोट झाल्याने, दहा वर्षाच्या मुलाची बोटं अक्षरश: तुटली आहेत.
जालना जिल्ह्यातील कोकाटे हदगाव इथं ही धक्कादायक घटना घडली.
उमेश राठोड असं स्फोटात जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. तो लहान भावासोबत खेळत होता, त्यावेळी ही घटना घडली.
आई-वडील घरी नसताना दुपारी या मुलांनी बॅटरी फोडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी बॅटरीचा स्फोट झाल्यानं मोठ्या मुलाची बोटं तुटली.
स्फोट इतका भीषण होता उमेशचा अंगठा आणि त्या शेजारचं बोट अक्षरश: फुटलं. इतकंच नाही तर त्याच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे.
दरम्यान, त्याच्यावर औरंगाबादेतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मोबाईल फोन वापरताना कोणती काळजी घ्यावी?
चार्जिंग सुरु असताना कधीही मोबाईल फोनवर बोलू नये.
मोबाईल फोन रात्रभर चार्जिंगला लावू नये.
फोन चार्जिंग करताना तो लाकूड किंवा काचेच्या टेबलवर ठेवावा. पलंग किंवा उशीवर ठेवू नये.
संबंधित बातम्या
चार्जिंगवेळी मोबाईल बॅटरीचा स्फोट, तरुणाची बोटं रक्तबंबाळ
चार्जिंग करताना फोन उचलल्याने शॉक, मुंबईत तरुणाचा मृत्यू
मोबाईल चार्जिंग लावताना शॉक लागून मृत्यू
लॅपटॉप चार्जरनं घेतला युवकाचा बळी!
चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा ब्लास्ट, स्फोटात 24 वर्षीय युवकाचा मृत्यू
पँटच्या खिशात मोबाईलचा स्फोट
खिशातच मोबाईल पेटला, वाढत्या तापमानामुळे स्फोटाचा अंदाज