नागपूर : नागपुरातील 18 वर्षांच्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन महिन्यांपूर्वी अपघातात मृत्युमुखी पडलेला चिमुकला सतत डोळ्यासमोर येत असल्याचं कारण सौरभ नागपूरकरने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.


सौरभने दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावर एका चिमुकल्याचा अपघात पाहिला होता. 'तो अपघात वारंवार माझ्या डोळ्यासमोर येतो. अपघातात मृत्युमुखी पडलेला चिमुकला मला बोलावतो, त्याचा आत्मा मला बोलावतो, म्हणून मी आत्महत्या करत आहे' असं कारण सौरभने आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत लिहिलं आहे.

नागपुरातील कसाबपुरा भागातील राहत्या घरी 14 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास सौरभने गळफास घेतला. सौरभ एका नामांकित कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता.