बीड : कोरोनामुळे सगळीकडे शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिकवणीवर भर दिला जात आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणासाठी घरच्यांनी टॅब घेऊन दिला नाही म्हणून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. अभिषेक संत, असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून गेवराई तालुक्याच्या भोजगावमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे ऑनलाईन शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
अभिषेकने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. पुढील शिक्षणासाठी त्याला टॅब हवा होता. टॅब घेऊन देण्यासाठी अभिषेक आपल्या वडिलांपाशी रोज हट्ट धरत असे. गेवराईच्या भोजगावमध्ये राहणाऱ्या संत कुटुंबीयांची घरची परिस्थिती जेमतेम असल्याने अभिषेक इयत्ता पाचवीपासून नगर जिल्ह्यात एका वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या आणि अभिषेक आपल्या गावी परतला. केवळ संत कुटुंबातच नाही तर गावात सुद्धा अभिषेक हुशार मुलांमध्ये गणला जायचा.
नवउद्योजकांसाठी 'विको'चे संजीव पेंढारकरांचा उपक्रम, ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन
आई-वडील उसतोड कामगार
अभिषेकचे कुटुंबीय दरवर्षी उसतोडणीला जातात. यातूनच त्यांनी आपल्या दोन मुलांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मात्र, सध्या पेरणीचे दिवस असल्याने घरात आर्थिक अडचण होती. शाळा सुरू झाली नाही म्हणून टॅब घेण्यासाठी घरचे देखील चालढकल करत होते. कोरनामुळे आधीच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. आपल्या पोराला चांगलं शिक्षण मिळावं असं कोणत्या आई-बापाला वाटत नाही? पोटाला चिमटा घेऊन पै-पै करुन आपल्या पोटच्या गोळ्याला मोठं करण्याचे स्वप्न याही आईवडिलांनी बघितलं होतं. पण मोबाईल टॅब सारख्या शुल्लक गरजेला अभिषेक बळी पडला अन् त्याने आयुष्य संपवले.
शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणासाठी गाईडलाइन्स तयार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा व महाविद्यालये सुरु करता येणार नसल्याने नवं शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने सुरु करणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. शाळांनी सुरु केलेल्या ऑनलाईन वर्गाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर होऊ नये, यासाठी काही गाईडलाईन्स शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप या सूचनांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर हे निर्देश शाळा व इतर शैक्षणिक संस्थांना जारी करण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
Pune Suicide | पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या