नागपूर : नागपुरात गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे भीती व्यक्त केली जात असतानाच हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. चिखल उडाल्यामुळे तिघा जणांनी 17 वर्षीय मुलावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

 
तिघे आरोपी रस्त्यावरुन जात असताना तरुणाच्या बाइकमुळे त्यांच्या अंगावर चिखल उडाला. या रागाच्या भरात त्यांनी तरुणाला थांबवलं. यावेळी झालेल्या क्षुल्लक वादावादीनंतर त्यांनी तरुणाला जबर मारहाण केली. या हल्ल्यात अल्पवयीन मुलगा अक्षय सहारे गंभीर जखमी झाला आहे.

 
मंगळवारी मध्यरात्री नागपुरातील गोळीबार चौकावर ही घटना घडली. घटनेनंतर तिन्ही हल्लेखोर पसार झाले असून जखमी तरुणावर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहेत.