आकाश पाळण्यातून पडून दोघे जण गंभीर जखमी
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव Updated at: 22 Jan 2018 10:15 PM (IST)
आकाश पाळण्यातून सेल्फी काढताना दोघं जण खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
NEXT PREV
जळगाव : उंचावर गेलेल्या आकाश पाळण्यात बसून सेल्फी काढणे दोन तरुणांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. जळगावमधील अट्रावल येथील यात्रेत आकाश पाळण्यातून सेल्फी काढताना दोघं जण खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. योगेश भारंबे आणि शेखर तेली अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अट्रावल येथे दरवर्षी मुंजोबाची यात्रा भरते. या यात्रेत संपूर्ण खान्देशातून भाविक येतात. त्यामुळे या जत्रेत मोठ्या प्रमाणात आकाश पाळणे आणि इतर खेळ सुरु असतात. आज दुपारच्या दरम्यान आकाश पाळण्यात बसून योगेश आणि शेखर हे सेल्फी काढत होते. त्याचवेळी तोल जाऊन दोघेही खाली पडले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
योगेशच्या डोक्याला जबर मार लागला असून शेखरचा उजवा हात गंभीररित्या फ्रॅक्चर झाला आहे. दोघांनाही जळगावमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.