Book Prices Hike by 20 to 30 Percent : लवकरच नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमवर आता विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरु होईल. अगदी पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तकांपासून गणवेशापर्यंत सगळी खरेदीची धावपळ सुरु होईल. मात्र देशातील वाढत्या महागाईचा फटका आता शालेय जीवनावरही होणार आहे. महागाईचा परिणाम अभ्यासावरही होणार आहे. यावर्षी तुम्ही वह्या पुस्तके खरेदी करायला जाताय तर तुम्हाला खिशाला कात्री लागणार आहे. आता शालेय साहित्याच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. वह्या आणि पुस्तकांच्या 20 ते 30 टक्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक खर्चाचा भार वाढणार असल्याचं चित्र आहे.


देशात सध्या महागाई भडका उडालेला दिसत आहे. एकीकडे भाज्या, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलासह एलपीजी सिंलेडरचेही भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे आता या महागाईचा परिणाम शैक्षणिक पातळीवरही होणार आहे. वह्या, पुस्तकांच्या किंमती वाढल्याने पालकांच्या अडचणी वाढणार आहेत. अवघ्या 15 दिवसांनतर नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. मात्र यावर्षी तुम्ही वह्या पुस्तके खरेदी करायला जाताय तर तुम्हाला खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे. वह्या आणि पुस्तके तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती  कोरोना काळात वाढल्याने तसेच कागदाचे प्रतिकिलो दर वाढले आहेत.


कोरोनामुळे देशासह जगभरातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. कोरोना काळात वह्या आणि पुस्तके बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे याचा भार आता शालेय जीवनावर पडणार आहे. शैक्षणिक वस्तू आणि साहित्याचे दरावर जीएसटीही वाढवल्याने उत्पादकांना दर वाढवावे लागले आहेत. त्यामुळे याचा फटका वह्या आणि पुस्तकांच्या किंमतीना बसणार आहे. 


पाहा व्हिडीओ : School Reopen :शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शालेय साहित्य महाग, कच्चा माल महाग वह्या पुस्तक महागली



महत्त्वाच्या इतर बातम्या