Nashik News :  आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा आणि दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी देशभरात एकलव्य मॉडेल निवासी शाळा उभारण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर गावातही हि शाळा उभी राहणार आहे.  


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्य स्तरावर एकलव्य निवासी शाळा सुरु केल्या. २००१ ते २०१९ पर्यंत २५ एकलव्य निवासी शाळा सुरु आहे. विशेष म्हणजे या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएससी) या अभ्यासक्रमाचे इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण देण्यात येते. यात विद्यार्थ्यांना भोजन, निवास व्यवस्था, अंथरूण, वह्या पुस्तके, गणवेश, लेखन साहित्य शासनामार्फत मोफत पुरवण्यात येतात. नाशिक, नागपूर, अमरावती, पालघर, गडचिरोली, नंदुरबार, गोंदिया, धुळे, नांदेड, ठाणे, चंद्रपूर, यवतमाळ, अहमदनगर या ठिकाणी एकलव्य निवासी शाळा सुरु आहेत. इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा कल असलेले अनेक विद्यार्थी इयत्ता सहावीपासून एकलव्य निवासी शाळेत प्रवेश घेतात. मात्र पहिलीपासून मराठी माध्यमात शिक्षण झाल्यावर या विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेत सीबीसीसी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश देत असल्याने त्यांना भाषेची अडचण येते.


दरम्यान नाशिकमध्ये देखील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये असंख्य आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. अलीकडे आदिवासी विद्यार्थ्यांचा देखील इंग्रजी शिक्षणाकडे कल वाढल्याचे यावरून दिसून येते. नुकतेच केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सुरगाणा तालुक्यातील शिंदे येथे एकलव्य आदर्श  निवासी शाळेच्या (इएमआरएस ) बांधकामाचे भूमिपूजन केले. नाशिकच्या दुर्गम आदिवासी भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे हा या प्रस्तावित एकलव्य आदर्श  निवासी शाळेचा उद्देश आहे. जवळपासच्या आदिवासी भागात दर्जेदार शिक्षणाला चालना देण्यासाठी आदिवासी कार्य मंत्रालयाने शिंदे येथे एकलव्य आदर्श निवासी शाळेची योजना आखली असून या एकलव्य आदर्श निवासी शाळेमध्ये सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकवला जाईल, अशी माहिती मंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितले.  


एकलव्य शाळेचे मॉडेल 


आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण  शिक्षण देण्यासाठी एकलव्य आदर्श निवासी शाळा विकसित केल्या जात आहेत. या शाळांमध्ये  केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमावरच नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. या शाळा सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देतात, प्रत्येक शाळेत ४८० विद्यार्थ्यांची क्षमता असते. ५० टक्के पेक्षा जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि किमान २० हजार आदिवासी लोकसंख्येसाठी एकलव्य आदर्श निवासी शाळा सुरु केली जाते. 


इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव 


सदर एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये आता इंग्रजी माध्यमांचे शिक्षणही दिले जाते. आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा आणि या विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर व्हावी या उद्देशाने एकलव्य निवासी शाळेत पहिलीपासूनच सीबीएससी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीची गोडी वाढीस लागेल. त्याचबरोबर पुढे जाऊन नोकरीसाठी इंग्रजी चा फायदा होईल उभा उद्देशाने सर्व एकलव्य शाळांत सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येत आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI