मुंबई: विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या बीएमएम शाखेच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच लोणंदला भेट दिली. दरवर्षी परंपरे प्रमाणे लोणंदला ज्ञानेश्वर माऊलींचे पहिला रिंगण सोहळा संपन्न होतो. माऊलींच्या रिंगण सोहळ्याचा अनुभवण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती.


 

साठ्ये महाविद्यालयाच्या आकाश एकावडे आणि संजय पाटील यांनी या निमित्ताने वारकरी परंपरेची महती वारकऱ्यांकडून जाणून घेतली. सहाय्यक प्राध्यापक मंदार पुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. लोणंद येथे चांदोबाचे लिंबमंदिराच्या समोर दरवर्षी प्रथेप्रमाणे उभे रिंगण संपन्न होते त्या मानाच्या २७ दिंड्या रांगेत उभ्या करण्यात येतात.

 

दिंड्यांची रांग लावल्यानंतर शितोळे सरदारांचा अश्व माऊलींचे दर्शन घेण्यासाठी वायूवेगाने कूच करतो तो रोमांचकारी क्षण याची देही याची डोळा साठवण्यासाठी लाखभर वारकरी दिवसभर प्रतिक्षा करतात. साठ्येच्या विद्यार्थ्यांनी देखील हा अपूर्व सोहळा आपल्या कॅमेरात टिपला.