विखेंच्या कारखान्यात मळीच्या टाकीचा स्फोट, 2 कामगारांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2016 07:30 AM (IST)
शिर्डी: शिर्डीमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा साखर कारखान्यात ऊसाच्या मळीच्या टाकीचा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. लोणी प्रवरानगर भागात ही धक्कादायक घटना घडली. या स्फोटात 10 ते 12 कामगार जखमी झाले आहेत. त्यांना प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र या भीषण स्फोटामुळे परिसरात भयभीतता पसरली आहे.