रत्नागिरी: रत्नागिरीत एसटी डेपोला आज पहाटेच्या दरम्यान अचानक आग लागली. आग लागल्यानं त्यामुळे एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली.
कॅश विभागात आगीचा प्रभाव सर्वाधिक होता. यात तिकीटांची 100 हून अधिक मशीन जळून खाक झाले आहेत. दरम्यान, ही आग कशामुळे लागली आहे याबाबत अद्याप नेमकं कारण समजू शकलेलं नाही. आगीमध्ये एसटी आगाराचं मोठं नुकसान झाल्याचं समजतं आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांना जुनी तिकीट देण्यात आली आहेत.
गेल्या दोन महिन्यात रत्नागिरी एसटी डेपोला आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे आजच्या आगीनंतर परिक्षार्थी विद्यार्थी आणि प्रवाशांचे चांगलेत हाल झालेले पहायला मिळाले. त्यामुळे वारंवार आग लागण्याचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत.